शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

महामॅरेथॉन ही धावपटूंसाठी पर्वणी; माजी आंतरराष्ट्रीय धावपटू विद्या देवघरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 10:03 IST

लोकमतने आयोजित केलेली महामॅरेथॉन ही नागपूरसह विभागातील धावपटूंसाठी पर्वणी आहे असे मत माजी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू विद्या देवघरे (धापोडकर) यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देयुवा धावपटूंनी कठोर मेहनत घ्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लोकमतने आयोजित केलेली महामॅरेथॉन ही नागपूरसह विभागातील धावपटूंसाठी पर्वणी आहे. अशा आयोजनांमुळे धावपटूंना बळ मिळतेच शिवाय धावण्याची चळवळ देखील रुजविण्यास मदत मिळते, असे मत माजी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू विद्या देवघरे (धापोडकर) यांनी व्यक्त केले.वेगवेगळ्या वयोगटातील, घटकांतील लोक एकत्र येणे हा चांगला संदेश आहे. महामॅरेथॉन हा चैतन्याचा सोहळा असून लोकमतचा पुढाकार हा स्वच्छ आणि स्पष्ट असल्याने अनेक लोक लोकमतशी जोडले गेले आहेत. त्यापैकीच मी एक असल्याचे विद्या यांनी सांगितले. द.पूर्व रेल्वेत कार्यरत असलेल्या विद्या मैदानावर आजही सक्रिय आहेत. त्यांनी ४५ वर्षे वयोगटात वाशिम येथे ४००, ८०० आणि १५०० मीटर दौडमध्ये नुकतेच सुवर्ण जिंकले. मास्टर्स गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करीत असलेल्या लांब पल्ल्याच्या शर्यती गाजविणाऱ्या विद्या म्हणाल्या,‘आयोजन निटनेटके असून खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करण्यास पूरक आहे. अलीकडे मॅरेथॉनचे आयोजन सर्व स्तरावर वाढल्याने खेळाडू देखील उत्साहित असतात. दौड पूर्ण केलीच पाहिजे असे नाही, सहभाग नोंदविणे आणि मॅरेथॉनचा आनंद उपभोगणे ही देखील महत्त्वाची बाब आहे. यामुळे धावण्याचे महत्त्व आणि जागरुकता वृद्धिंगत होते.’ लोकमतच्या पुढाकाराने आयोजित होत असलेल्या महामॅरेथॉनबद्दल त्या म्हणाल्या,‘प्रत्येक उपक्रमात लोकमत नंबर वन असतो, मॅहामॅरेथॉनचे आयोजनदेखील अल्पावधीत लोकप्रिय होईल. नव्या दमाच्या धावपटूंसाठी लोकमतने उपलब्ध करून दिलेली संधी त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यासपीठ गाजविण्यास उपयुक्त ठरेल’, अशी खात्री आहे. युवा धावपटूंना मैदानावर घाम गाळून अधिक कठोर मेहनत करण्याचा सल्ला देत विद्या पुढे म्हणाल्या,‘आमच्यावेळी नागपुरात सिंथेटिक ट्रॅकची सोय नव्हती. पुरेशी मैदाने नव्हती. सुसज्ज व्यवस्था नव्हती. तरीही आम्ही मैदान गाजवित नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. सध्या अनेक सोयी उपलब्ध झाल्याने युवा धावपटू नागपूरला ‘लांब पल्ल्याच्या धावपटूंचे शहर’ अशी ओळख पुन्हा मिळवून देतील यात शंका नाही,’

विद्या देवघरे यांची मॅरेथॉन कामगिरीविद्या यांचा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये धावण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्या पॅरिस येथील वर्ल्ड क्रॉस कंट्री, बोस्टन (अमेरिका) तसेच बुडापेस्ट (हंगेरी) येथील विश्व क्रॉस कंट्रीत सहभागी होत्या. १९९३ ची ठाणे महापौर मॅरेथॉनच्या त्या विजेत्या आहेत. त्याआधी १९९० मध्ये त्यांनी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन देखील जिंकली. याच स्पर्धेत त्यांनी चारवेळा पहिल्या तीन धावपटूंमध्ये स्थान मिळविले होते. आंतर रेल्वे आणि विभागीय स्पर्धांमध्येही विद्या यांनी स्वत:चे स्थान मिळविले होते. १९९०ते २००० च्या दशकात विद्या देवघरे यांच्या नावाने अन्य धावपटूंना घाम फुटायचा. विद्या मैदानावर असेल तर आपले काय, याबद्दल धडकी भरायची.अलाहाबादच्या अ.भा.इंदिरा मॅरेथॉनमध्ये ४२ किमी अंतराच्या शर्यतीच्या त्या विजेत्या राहिल्या आहेत. आजही युवा धावपटूंना मार्गदर्शक आणि प्रेरक ठरावा असा मैदानावरील सराव कायम आहे. मास्टर्स गटाच्या विविध अंतराच्या स्पर्धेत विद्या पदक विजेत्या ठरत आहेत.

टॅग्स :Lokmat Nagpur Maha Marathon 2018लोकमत नागपूर महामॅरेथॉन २०१८