शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूरच्या महाराजबागेची शान गेली : ‘जाई’ वाघिणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:38 IST

येथील महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची शान समजल्या जाणाऱ्या ‘जाई’ वाघिणीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. गेल्या साडेचार महिन्यांपासून ही वाघिण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यात यश आले नाही.

ठळक मुद्देप्राणिप्रेमींमध्ये हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येथील महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची शान समजल्या जाणाऱ्या ‘जाई’ वाघिणीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. गेल्या साडेचार महिन्यांपासून ही वाघिण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यात यश आले नाही.आईपासून दुरावलेल्या जाई व जुई या दोन वाघिणींना नोव्हेंबर २००८ साली मेडकी, जि. चंद्र्रपूर येथील जंगलातून आणण्यात आले होते. तेव्हापासून गेली १० वर्षे या दोघी महाराज बाग प्राणिसंग्रहालयात होत्या. यापैकी जुईचा मृत्यू अगोदरच झाला. जुईच्या मृत्यूनंतर जाई महाराज बागेतील आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनली होती. परंतु ५ नोव्हेंबर २०१७ रोजी साप चावल्यामुळे ती आजारी पडली. महाराज बाग , कृषी महाविद्यालय प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून जाईला जिवंत ठेवले. १७ नोव्हेंबरला विविध तपासणी अहवालातून तिची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. महाराज बाग प्रशासनातर्फे तिच्यावर दिवसरात्र उपचार सुरु होते. या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही मिळाले. जाईच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा दिसून आली. त्यानंतर तिला १२ मार्च रोजी मोठ्या पिंजऱ्यात हलविण्यात आले आणि आवश्यक ते उपचार सुरु केले. परंतु २५ मार्च रोजी तिची प्रकृती खाल्यावल्यामुळे तिला प्राणिसंग्रहालयाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे प्रयत्न सुरु होते. परंतु २९ मार्च रोजी पहाटे ५ वाजता उपचारादरम्यान जाईचा मृत्यू झाला. या घटनेने महाराज बाग परिसरात शोककळा पसरली. सकाळी ११.३० वाजता तिचे शवविच्छेदन झाले. यावेळी डॉ. प्रशांत सोनकुसरे, डॉ. विनोद धूत, डॉ. गौतम भोजने, डॉ. सुनील बावस्कर, व डॉ. अभिजित मोटघरे उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर दुपारी १२.१५ च्या सुमारास प्राणिसंग्रहालय परिसरात जुईला अगी्न देऊन अंत्यविधी करण्यात आला.अंत्यविधीच्या वेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी पार्लावार, प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर, डॉ. अभिजित मोटघरे, महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी प्राध्यापक दिनकर जीवतोडे, विशेष अधिकारी डॉ. सुभाष पोटदुखे, सहायक कुलसचिव आर.डी. चव्हाण, वन्यजीव रक्षक कुंदन हाते उपस्थित होते.... म्हणून वाघाचा मृतदेह जाळला जातोडॉ. बावस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार वाघ, चिता, भालू यासारखे वन्य प्राण्यांचा मृत्यूनंतर त्यांचे पोस्टमार्टम करून विसरा काढला जातो. तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला जातो. या विसºयाच्या आधारावर प्राण्यांच्या मृत्यूची कारणे शोधली जातात. मृत्यूनंतर या प्राण्यांना जाळलेच गेले पाहिजे, असे आवश्यक नाही. परंतु वाघ, चिता आणि भालू यासारख्या वन्य प्राण्यांची स्किन, नखे, दात आणि शरीराचे इतर अंग हे अतिशय किमती असतात. खड्डा खोदून अंत्यसंस्कार केल्यास मृतदेह चोरून त्याची तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून या प्राण्यांचा मृतदेह जाळला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.‘जान’ राहिली एकटीचंद्रपूरच्या जंगलातून जाई व जुईला अतिशय नाजुक अवस्थेत महाराज बागेत आणण्यात आले होते. जुईलाही वाचवण्याचा बराच प्रयत्न झाला होतो. पण तिला वाचवता आले नव्हते. त्यानंतर जाई महाराज बागेत इतर वाघांसोबत राहू लागली. नंतर जुनैना येथे आईपासून दुरावलेल्या ‘ली’, जान आणि चेरी सुद्धा महाराज बागेत आल्या. यानंतर शिकाऱ्यांच्या जाळात फसून अपंग झालेला वाघ ‘साहेबराव’ यालाही महाराज बागेत आणण्यात आले. परंतु नंतर त्याला गोरेवाडा येथे पाठवण्यात आले. नंतर ‘ली’ ला साहेबरावसोबत गोरेवाडा जंगलात पाठवण्यात आले. आता जाईच्या मृत्यूनंतर ‘जान’ ही महाराज बागेत एकटीच राहिली आहे. तिला आता नवीन सोबती कधी व केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Maharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूरTigerवाघ