शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वमर्जीने शरीर संबंध ठेवल्यानंतर बलात्काराची तक्रार करणे कायद्याचा दुरुपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 13:12 IST

स्वमर्जीने शरीर संबंध ठेवल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराची तक्रार नोंदविणे म्हणजे, कायद्याचा दुरुपयोग करणे होय, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून आरोपीविरुद्धचा एफआयआर रद्द केला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निष्कर्षआरोपीविरुद्धचा एफआयआर रद्द

आॅनलाईन लोकमतनागपूर : स्वमर्जीने शरीर संबंध ठेवल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराची तक्रार नोंदविणे म्हणजे, कायद्याचा दुरुपयोग करणे होय, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून आरोपीविरुद्धचा एफआयआर रद्द केला आहे.न्यायमूर्ती रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला आहे. प्रकरणातील आरोपीचे नाव धीरज खाटिक असून तो भंडारा येथील रहिवासी व व्यवसायाचे शिक्षक आहे. आरोपी व तक्रारकर्ती कविता (बदललेले नाव) यांची २००७ मध्ये ओळख झाली. त्यांच्यात लवकरच चांगली मैत्री झाली व त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ते रोज फोनवर बोलत होते व नियमित एकमेकांना भेटत होते. पोलीस तक्रारीनुसार, कविताकडे आरोपी नेहमीच शरीर संबंधाची मागणी करीत होता. कविता त्याला प्रत्येकवेळी नकार देत होती. परंतु, एक दिवस त्याने लग्न करण्याचे वचन देऊन कविताला शरीर संबंधासाठी राजी केले. आरोपीने मित्राच्या खोलीमध्ये कवितासोबत दोनदा शरीर संबंध ठेवले. दरम्यान, आरोपीने दुसऱ्याच मुलीसोबत साखरपुडा केला. परिणामी, कविताने २२ डिसेंबर २०१६ रोजी आरोपीविरुद्ध बलात्काराचा एफआयआर नोंदवला.आरोपीने एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सदर निरीक्षण नोंदवून आरोपीचा अर्ज मंजूर केला. आरोपी व कविताचे १० वर्षांपर्यंत प्रेम संबंध होते. त्या काळात तिने तक्रार नोंदवली नाही. आरोपी दुसऱ्या  मुलीसोबत लग्न करीत असल्याचे कळल्यानंतर ती पोलिसांकडे गेली. तक्रारीवरून तिने सहमतीने शरीर संबंध ठेवल्याचे स्पष्ट होते. शरीर संबंध ठेवले त्यावेळी ती सज्ञान होती. त्यामुळे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध होत नाही असेही न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय