शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल व्यवहारासाठी एम अ‍ॅण्ड एम फायनान्सची मोहीम

By admin | Updated: March 9, 2017 02:39 IST

डिजिटल पेमेंटची साक्षरता देशात ५० लाख लोकांवर पोहोचविण्याचे महिन्द्र अ‍ॅण्ड महिन्द्र फायनान्स सर्व्हिसेस

 अनुज मेहरा : सहा राज्यांमध्ये सुरू नागपूर : डिजिटल पेमेंटची साक्षरता देशात ५० लाख लोकांवर पोहोचविण्याचे महिन्द्र अ‍ॅण्ड महिन्द्र फायनान्स सर्व्हिसेस (एम अ‍ॅण्ड एमएफएस) समूहाचे लक्ष असल्याची माहिती महिन्द्र ग्रामीण गृह फायनान्सचे (एमआरएचएफ) व्यवस्थापकीय संचालक अनुज मेहरा यांनी बुधवारी दिली. पत्रपरिषदेत मेहरा म्हणाले, समूहाचे कार्यान्वयन ११ राज्यांमध्ये आहे. त्यापैकी सहा राज्यांमध्ये डिजिटल पेमेंट साक्षरता मोहीम दाखल केली आहे. या समूहात एम अ‍ॅण्ड एमएफएस, एमआरएचएफ, महिन्द्रा इन्शुरन्स ब्रोकर्स (एम अ‍ॅण्ड एमआयबी), एम अ‍ॅण्ड एम अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी (एम अ‍ॅण्ड एमएएमसी), एम अ‍ॅण्ड एम ट्रस्टी कंपनी (एम अ‍ॅण्ड एमटीसी) या पाच कंपन्यांचा समावेश आहे. ‘एमआरएचएफ’ने ११ राज्यांमध्ये ४.५० लाख लोकांना ४५०० कोटींचे कर्ज वितरण केले आहे. कंपनी गावकऱ्यांना छोटे गृहकर्ज देते. या कर्जाचा वार्षिक दर १४ ते १८ टक्के आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात मेहरा म्हणाले, नोटाबंदीनंतर कंपनीचा व्यवसाय मुख्यत्वे वसुली ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. पण सध्या स्थिती सामान्य आहे. देशात नव्याने सुरू झालेल्या कॅशलेश अथवा लेश-कॅश अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर कंपनीतर्फे डिजिटल पेमेंट मोहीम राबविण्यात येत आहे. कंपनीचे १० हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागाचा दौरा करून स्ट्रीट शो आणि पॉवर पॉर्इंट सादरीकरणाद्वारे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले आहे. याशिवाय कंपनीतर्फे चेकची समस्या अथवा ई-वॅलेटद्वारे व्यवहार तसेच डेबिट व के्रडिट कार्डद्वारे व्यवहार कसा करायचा, या संदर्भात संपूर्ण माहिती ग्राहकांना देण्यात येत आहे. डिजिटल पेमेंटची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने १८००-२३३-५३३३ या टोल फ्री क्रमांकासह फ्री कॉल सेंटर सुरू केले आहेत. या माध्यमातून कुणालाही माहिती मिळणार आहे. पत्रपरिषदेत एमआरएचएफचे मुख्य कार्यान्वयन अधिकारी शांतनू रेगे आणि महाराष्ट्र प्रमुख विनोद शर्मा उपस्थित होते.(प्रतिनिधी)