शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यूएसए मध्ये गुडविल अ‍ॅम्बेसडर बनविण्याची थाप : डॉक्टरला घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 01:01 IST

यूएस मध्ये गुडविल अ‍ॅम्बेसडर बनविण्याचे स्वप्न दाखवून एका डॉक्टरला सायबर गुन्हेगारांनी सव्वादोन लाखांचा गंडा घातला.

ठळक मुद्देसव्वादोन लाख लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यूएस मध्ये गुडविल अ‍ॅम्बेसडर बनविण्याचे स्वप्न दाखवून एका डॉक्टरला सायबर गुन्हेगारांनी सव्वादोन लाखांचा गंडा घातला. सोनेगाव पोलीस ठाण्यात आलेल्या या प्रकरणामुळे पोलीसही चक्रावले आहेत.सोमलवाड्यात राहणारे प्रशांत सीतारामजी चंदनखेडे (वय ४०) डॉक्टर आहेत. त्यांनी २०१७ मध्ये संयुक्त राष्ट संघाच्या कथित संकेतस्थळावर नोकरी संबंधाने मेसेज पाठविला होता. त्यांना तिकडून बायोडाटा मागितला गेला.त्यानंतर कथित अधिकाऱ्याने चंदनखेडे यांना यूएसएचे गुडविल अ‍ॅम्बेसडर म्हणून नियुक्त करण्याची थाप मारली. त्यासाठी मिनिटेरियन प्रोजेक्टला तीन हजार बिलियन डॉलर देण्याचीही बतावणी केली. मात्र, हे डॉलर घेण्यापूर्वी ७५० यूएस डॉलर जमा करावे लागेल, असे सांगितले. चंदनखेडे यांनी अमेरिकेतील अकासिया प्लेस, मिसोरी, टेक्सास शहरातील बँक ऑफ अमेरिकामध्ये रक्कम जमा करायला सांगितल्याने चंदनखेडे यांना विश्वास वाटला होता. त्यामुळे त्यांनी या बँकेत नंतर चित्तोडगड (राजस्थान) आणि आयसीआयसीआयच्या कोलकाता (पश्चिम बंगाल) बँकेत रक्कम जमा करायला लावली. २० नोव्हेंबर २०१७ ते २ फेब्रुवारी २०१९ पर्यंत एकूण २ लाख, २० हजार रुपये जमा केल्यानंतरही वेगवेगळी कारणे सांगून रक्कम जमा करण्यास सांगितले जात असल्याने चंदनखेडे यांना संशय आला. त्यांनी रक्कम जमा करण्यास नकार देताच आरोपीने चंदनखेडेंसोबत संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने चंदनखेडे यांनी सोनेगाव पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रकरण तपासासाठी सायबर शाखेकडे सोपविण्यात आले आहे.सारेच चक्रावून टाकणारेआरोपींनी ज्या पद्धतीने अमेरिकन बँक, राजस्थान, पश्चिम बंगालमधील बँकेत खाते उघडले. संयुक्त राष्ट्रसंघाचे संकेतस्थळ / बनावट आयडी तयार केली आणि चंदनखेडे यांना फसविले, तो सर्वच प्रकार चक्रावून सोडणारा आहे. सायबर गुन्हेगार नवनवीन पद्धतीने फसवणूक करीत असल्याने सर्वसामान्यच नव्हे तर आता पोलिसांनाही तोंडात बोट घालायला भाग पाडत आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमdoctorडॉक्टर