शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

फुप्फुसांच्या कर्करोगामुळे मृत्यूचे प्रमाण ३० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:07 IST

- जागतिक तंबाखू विरोधी दीन नागपूर : फुप्फुसांचा कर्करोग हा पहिल्या पाच जीवघेण्या आजारापैकी एक आहे. दिल्ली, चेन्नई, बंगलोरनंतर ...

- जागतिक तंबाखू विरोधी दीन

नागपूर : फुप्फुसांचा कर्करोग हा पहिल्या पाच जीवघेण्या आजारापैकी एक आहे. दिल्ली, चेन्नई, बंगलोरनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. जगात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जवळपास ३० टक्के आहे. महिलांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण २० टक्के आहे. भारतात फुप्फुसांच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सरासरी ९.८१ टक्के आहे. वेळीच उपचार घेतल्यास कॅन्सरचा रुग्ण बरा होऊ शकतो. तंबाखूच्या दुष्परिणामांच्या माहितीची जनजागृती करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

जगभरात फुप्फुसांच्या कर्करोगाच्या घटना वाढू लागल्या आहेत. सर्व प्रकारच्या कर्करोगांमध्ये या रोगाचे प्रमाण १४.४ टक्के आहे. भारतात दरवर्षी या रोगाचे सुमारे ६३ हजार नवीन रुग्ण आढळून येतात. नवीन ग्लाबोकॅन अहवालानुसार स्तन, गर्भाशय व मुख कर्करोगानंतर फुप्फुसांचा कर्करोग हा चौथ्या स्थानी आहे. फुप्फुसांचा कर्करोग असलेल्या भारतीय रुग्णांमध्ये तंबाखू हे मुख्य कारण ठरले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया म्हणाले, धूम्रपान आणि फुप्फुसांचा कर्करोग याचा जवळचा संबंध आहे. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हा आजार ८७ टक्के, तर अप्रत्यक्षरीत्या सेवन करणाऱ्यांमध्ये तीन टक्के आहे. या आजाराच्या रुग्णांच्या मृत्यूचे महत्त्वाचे कारण म्हणजे उशिरा निदान होणे होय. याशिवाय चुकीचे निदान करून क्षयरोग झाल्याचे दाखविले जाते. फुप्फुसांचा कर्करोग शहरातच नाही तर ग्रामीण भागांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

- या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

दोन ते तीन आठवड्यांपर्यंत सुरू असलेला खोकला, खोकताना रक्त येणे, सतत छातीत दुखणे, श्वास घेताना किंवा खोकताना त्रास होणे किंवा वेदना होणे, थकवा वाटणे, भूक न लागणे किंवा अनपेक्षितपणे वजन कमी होणे, धाप लागणे किंवा श्वास घेताना दम लागणे आणि आवाज घोगरा होणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. फुप्फुसांच्या कर्करोगाला दूर ठेवायचे असल्यास आजच धूम्रपानाची सवय सोडा.

-डॉ. सुशील मानधनिया, कर्करोगतज्ज्ञ

-धूम्रपानामुळे आयुष्याची १५ वर्षे कमी होतात

तंबाखूचे व्यसन वाढतच चालले आहे. असेच राहिल्यास २०३०पर्यंत १० पैकी एक रुग्ण तंबाखूमुळे आजारी पडेल. धूम्रपानाच्या व्यसनामुळे आयुष्याची १५ वर्षे कमी होतात. भारतात दरवर्षी जवळपास १२ लाख कर्करोग रुग्णांची नोंदणी होते. यात सुमारे पाच लाख पुरुष व तीन लाख महिलांचा विविध कर्करोगाने मृत्यू होतो. जगात १९ टक्के लोकांना, तर भारतात ३२ टक्के लोकांना विविध प्रकारांतील तंबाखूची सवय आहे. ८० टक्के तंबाखूचे सेवन करणारे लोक हे मध्यम देशातील आणि गरीब स्थितीतील लोक आहेत.

- डॉ. करतार सिंग, संचालक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल