शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

‘राशी-कवच’ची धमाल

By admin | Updated: June 14, 2016 02:37 IST

व्यक्तींच्या राशीमुळे त्यांच्यात आलेले गुणधर्म, स्वभाव वैशिष्ट्य आणि त्यामुळे होणाऱ्या विविध गमतीजमती, यावर

कलर्स व लोकमत सखी मंचचे आयोजन : १२ राशींच्या प्रभावांचे मनोरंजक विश्लेषणनागपूर : व्यक्तींच्या राशीमुळे त्यांच्यात आलेले गुणधर्म, स्वभाव वैशिष्ट्य आणि त्यामुळे होणाऱ्या विविध गमतीजमती, यावर आधारित ज्योतिषाचार्य अरविंद पांडे आणि नाट्य दिग्दर्शक संजय पेंडसे यांच्या ‘राशी-कवच’ कार्यक्रमाने शनिवारी धमाल उडवली. कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंचच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याभोवती आपले आयुष्य फिरत असते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तिन्ही काळांचा विचार करून पावले टाकत असतो. काल केलेल्या चुका आज करायच्या नाही आणि पुढेसुद्धा होऊ द्यायच्या नाहीत, असे ठरविणारी प्रत्येक व्यक्ती तिन्ही काळांचा विचार करीत असते. पण हा विचार करीत असताना नेमका राशींचा प्रभाव त्याच्या जीवनावर कसा आणि केव्हा होतो, मनुष्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी, त्याचा व्यवसाय, प्रगती, नोकरी, यश या सर्व गोष्टींवर त्याच्या कर्तृत्वाबरोबर त्याच्या नशिबाचा आणि राशींचा कसा प्रभाव पडतो, हेच नेमके या कार्यक्रमातून सांगण्यात आले. वेगळा विषय, वेगळी कथा, वेगळा बाज अशी या कार्यक्रमाची प्रस्तुती राहिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात राशींच्या गमतीजमती सांगताना १२ राशींच्या व्यक्तीला व्यासपीठावर बोलावले. त्यांच्या स्वभावाचे विश्लेषण केले. शंकरनगर येथील साई सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन अलंकार ज्वेलर्सचे संचालक अशोक शहा, प्रसिद्ध ज्योतिषाचार्य अरविंद पांडे आणि प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक संजय पेंडसे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले. दरम्यान, कलर्सच्यावतीने प्रथमेश पालकर आणि प्रियंका पाटील या कलावंतांनी ‘राशी-कवच’ या मालिकेतील एक प्रसंग सादर केला. याला सखींनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला. संचालन नेहा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)