शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

समाजाला जोडणारा शायर हरविला

By admin | Updated: February 9, 2016 02:44 IST

आपल्या सहजसुंदर रचनांनी हिंदी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे शायर निदा फाजली यांचे सोमवारी निधन झाले.

निदा फाजली यांच्या निधनाने साहित्य जगतात शोकनागपूर : आपल्या सहजसुंदर रचनांनी हिंदी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे शायर निदा फाजली यांचे सोमवारी निधन झाले. आपल्या सुंदर रचनांनी समाजाला जोडणारा दुवा हरविला आहे. उपराजधानीच्या हिंदी, उर्दू साहित्यकारांनी निदांसोबत घालविलेल्या क्षणांना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.उर्दू साहित्यात हिंदीला ओळख दिलीनिदा फाजली यांच्या निधनाने उर्दू भाषिकांमध्ये हिंदीला ओळख मिळवून देणारा साहित्यकार हरपला आहे. त्यांनी हिंदी साहित्यात महत्त्वपूर्ण संशोधन केले आणि दोह्यांची सहज हिंदीमध्ये रचना करून लोकप्रिय केले. त्यांच्यातील विनम्रता प्रत्येकाला आपलसं करणारी होती. -प्रा. मधुप पांडेय, साहित्यकारनागपूरला घेतले होते घर१९६८ पासून निदा फाजली यांच्यशी मित्रता जुळली. आपल्याशी असलेल्या मित्रत्वामुळे निदा यांनी छावणी येथील गझल अपार्टमेंटमध्ये त्यांच्या व पत्नी मालती जोशी यांच्या नावाने एक घर खरेदी केले. मात्र नंतर ते घर विकले. निदा यांच्या निधनाने उर्दू शायरीच नाही तर देशाचे मोठे नुकसान झाले आहे.-जफर कलीम, ज्येष्ठ उर्दू शायरमानवतेला जिवंत ठेवणारा शायरकबिरानंतर दोह्यांना पुन्हा जिवंत करून निदा यांनी समाजातील ज्वलंत मुद्यांना खरेपणाने सडेतोडपणे समाजासमोर मांडले. आपल्या शायरीने त्यांनी मानवतेला जिवंत ठेवले होते. आम्ही आज आमच्या मार्गदर्शकाला मुकलो आहोत.- डॉ. सागर खादीवाला‘गया तो टुटकर रोया’निदा फाजली यांच्या निधनाने अतिव दु:ख झाले आहे. त्यांचे दोहे समाजातील ज्वलंत मुद्यांनाही आरसा दाखविणारे होते. निदा साहेबांना श्रद्धांजली अर्पण करताना ‘बिछडकर फुटकर रोया-गया तो टुटकर रोया’ एवढेच म्हणावेसे वाटते.-मधु गुप्ता लहानपणापासून जोडल्या गेलोवडिलांसोबत निदा यांची अतुट मैत्री होती. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्याशी जोडल्या गेलो. त्यांच्या शायरीत मातीचा गंध होता. बाबा ताजुद्दीन यांच्या सालाना उर्समध्येही ते अनेकवेळा सहभागी व्हायचे.- समीर कबीर, उर्दू शायरधर्मांना जोडणारे व्यक्तिमत्त्वफाजली यांच्या निधनाने उर्दू साहित्याचे नुकसान झाले. त्यांनी नेहमी समाजाला जोडण्याचे काम केले. त्यांच्या शायरीत अलीसोबतच राधा आणि कृष्णाची प्रतिमाही निर्माण होत होती.-लोकेंद्र सिंह, शायरदोह्यांमध्ये दु:खाचे वर्णननिदा यांच्या दोह्यांमध्ये समाजाच्या दु:खाचा सार वर्णन केला होता. ते केवळ उत्कृष्ट शायरच नव्हते तर साधे सरळ व्यवहार करणारे माणूस होते. -नरेंद्र सतीजा, अध्यक्ष, जगजितसिंह मंचशायरीमध्ये होती गंगाजमुनी तहजीबमुंबई येथे निदा यांच्याशी झालेली भेट एक अविस्मरणीय क्षणासारखी मनात कायम आहे. दोह्यांना पुनरुज्जीवित करून सामाजिक मुद्यांना समाजापर्यंत पोहचविले. त्यांच्या शायरीत राष्ट्रीय एकतेचे सार दिसून येते. त्यांच्या शायरीत असलेली गंगाजमुनी तहजीब सहज जाणवत होती.-निसार खान