शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात हरवला वचननामा

By admin | Updated: June 20, 2017 01:47 IST

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ब्रीदवाक्यानुसार लक्ष्य अंत्योदय, प्रण अंत्योदय व पथ अंत्योदय, अर्थात समाजातील शेवटच्या घटकापर्यत विकासाचा लाभ मिळावा, ...

निवडणुकीतील आश्वासनांचा विसर : जुन्याच योजनांचा समावेशलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ब्रीदवाक्यानुसार लक्ष्य अंत्योदय, प्रण अंत्योदय व पथ अंत्योदय, अर्थात समाजातील शेवटच्या घटकापर्यत विकासाचा लाभ मिळावा, या हेतूने महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केल्याचा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी केला आहे. परंतु महापालिका निवडणुकीतील वचननाम्याचा भाजपाला विसर पडला आहे. यामुळे अर्थसंकल्पात वचननामा हरवल्याची नागरिकांत चर्चा आहे.सर्वच योजना एका वर्षात कार्यान्वित करणे शक्य नाही. काही योजनांना चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. याचा विचार करता वचननाम्यातील योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने नियोजन करून त्याचा अर्थसंकल्पात समावेश अपेक्षित होता. तरच त्या पुढील चार ते पाच वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा ठेवता आली असती. परंतु आता पहिल्या वर्षात या योजनांना सुरुवात होण्याची शक्यता नाही. स्वच्छ व सुंदर शहर करण्याचे वचन दिले होते. परंतु स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहराचा क्रमांक २७ व्या क्रमांकावरून १२७ व्या क्रमांकावर गेला. शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सफाई कर्मचारी नाही. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. शहरातील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु अद्याप शहरातील सर्व भागातील नागरिकांना समान पाणी वितरण करणे शक्य झालेले नाही. उलट टँकरची संख्या वाढलेली आहे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदीची गरज होती. खासगी बसेसमुळे शहरातील नागरिकांना होणारा त्रास विचारात घेता या बसेसचे पार्किंग शहराबाहेर स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. बहुजन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या थोर पुरुषांच्या नावावर नवीन योजना सुरू करणे, शहरात जलतरण तलावांची निर्मिती करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी तरतूद नाही. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच उच्च शिक्षणासाठी गरीब मुलांना दत्तक घेण्याची ग्वाही दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम श्राफल्य योजनेंतर्गत २५ वर्ष सेवा झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घर दिले जाते. या योजनेचा गरजूंना लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु यासाठी तरतूद करण्यात आलेली नाही. कम्युनिटी आरोग्य केंद्राचा विसरशहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यानुसार शहारातील स्लम भागातील गरीब लोकांना उपचार मिळावे, यासाठी ५० हजार लोकसंख्येमागे एक कम्युनिटी आरोग्य केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १६ कें द्र सुरू होणे अपेक्षित होते. मात्र यासाठी तरतूद करण्यात आलेली नाही.वृद्धांना शास्ती माफी नाही८० वर्षांवरील वृद्ध नागरिकांना थकीत पाणी व मालमत्ता कराच्या शास्तीत सूट देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच ७० वर्षांवरील नागरिकांना यात २० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आलेली होती. परंतु या आश्वासनाचा विसर पडला आहे. तसेच इतरही अनेक योजनांसाठी तरतूद करण्यात आलेली नाही. जुन्या योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.