शहरं
Join us  
Trending Stories
1
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
2
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
3
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
4
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
5
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
6
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
7
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
8
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
9
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
10
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
11
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
12
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
13
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

धुक्यात हरवली वाट; १९ दिवस बंद राहणार काही उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 10:10 AM

गो एअरची दोन विमाने सिस्टिममधून काढून टाकण्यात आली आहेत. ११ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईल बुकिंग करणाऱ्यांना ही विमाने रद्द असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देपाच विमानांना विलंब दाट धुके चिंतेचा विषय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारी दिल्ली येथे दाट धुके असल्यामुळे विमानांच्या हवाई वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. दिल्ली येथून उड्डाण केलेली विमाने देशाच्या विविध भागात उशिरा पोहोचली. यामध्ये नागपुरातील तीन विमानांचा समावेश आहे.दिल्ली येथून नागपुरात उशिरा पोहोचणाऱ्या विमानांमध्ये इंडिगो एअरलाईन्सचे ६ई १३५ दिल्ली-नागपूर विमान २.२० मिनिटे उशिरा अर्थात निर्धारित वेळ दुपारी १२ ऐवजी २.२० वाजता पोहोचले. ६ई-२०१७ दिल्ली-नागपूर विमान जवळपास अर्धा तास विलंबाने सकाळी ९.०७ वाजता उतरले. याशिवाय गो एअरचे २५१९ दिल्ली-नागपूर विमान १.४५ मिनिटे उशिरा रात्री ८.२० ऐवजी १०.४० वाजता आले. इंडिगोचे ६ई ५३२५ मुंबई-नागपूर विमान अर्धा तास विलंबाने सकाळी १०.२९ वाजता पोहोचले. याशिवाय एअर इंडियाचे एआय-६२९ मुंबई-नागपूर विमान एक तास विलंबाने रात्री जवळपास ९.३० वाजता आले. दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये रविवारला वायू प्रदूषण वाढल्याने जास्त धुके दाटले होते. माहितीनुसार धुक्याची दृश्यता अत्यंत कमी झाली होती. धुक्यामुळे दृश्यतेवर अधिक परिणाम झाला. दिल्लीत अशाप्रकारे धुके नेहमीच दाटत असल्यामुळे चिंतेचा विषय झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान कंपन्यासुद्धा आता विमानाच्या वेळेच्या संदर्भात विचार करीत आहे. रविवारी धुक्यामुळे दिल्लीला येणाºया ३७ विमानांना इतरत्र वळविण्यात आले.

१९ दिवस बंद राहणार उड्डाण!गो एअरची दोन विमाने सिस्टिममधून काढून टाकण्यात आली आहेत. ११ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईल बुकिंग करणाऱ्यांना ही विमाने रद्द असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जी८-२५१५ दिल्ली-नागपूर विमान (उड्डाण सकाळी ६.५५ वाजता) आणि जी८-२५१६ नागपूर-दिल्ली (उड्डाण सकळी ९.०५ वाजता) या विमानांचा समावेश आहे. एअरलाईन्स सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विमाने रद्द करण्यामागे कंपनीला नागपूर कार्यालयाला अजूनही स्पष्टीकरण पाठविले नाही. पण सिस्टिमवर ‘ऑपरेशनल रिझन’ एवढेच दिसून येत आहे. जास्त प्रवासी मिळविण्याच्या काळात अर्थात ‘विंटर सीझन’मध्ये विमाने रद्द करण्याचे कारण का असावे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कंपनीला दिल्ली मार्गावर १९ दिवसांसाठी उड्डाण रद्द करावे लागलेआहे.

रायपूरला धुके, विमान नागपुरात वळविले एअर इंडियाच्या दिल्ली-रायपूर विमानाला धुक्याचा सामना करावा लागला. धुक्यामुळे विमान रायपूरला उतरू शकले नाही. अखेर नागपूरला वळवून उतरविण्यात आले. एअर इंडियाचे एआय ४७७ दिल्ली-रायपूर विमान रविवारी पहाटे ५.२५ वाजता दिल्लीहून रवाना झाले. सकाळी ७.३० च्या सुमारास रायपूर येथे पोहोचल्यानंतर दृश्यता कमी असल्यामुळे एटीसीकडून उतरण्यासाठी हिरवी झेंडी मिळाली नाही. त्यानंतर वैमानिकांने नागपूरच्या हवाई नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधून विमान उतरण्याची परवानगी मागितली. अखेर हे विमान (एअरबस ३१९) नागपुरात सकाळी ८.२५ वाजता उतरले. नागपुरात एक तास थांबल्यानंतर सकाळी ९.२० वाजता पुन्हा रायपूरकडे रवाना झाले. प्राप्त माहितीनुसार रायपूर येथे सकाळी ९.३० पर्यंत येणारी सर्व विमाने उशिरा पोहोचली आणि धुक्यामुळे काही विमानांना इतरत्र वळवावे लागले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर