शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळ्या साडेआठ लाख लुटले

By admin | Updated: October 19, 2016 03:09 IST

जनावरांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यांच्या दुचाकीतील साडेआठ लाखांची रोकड लुटारूंनी लंपास केली.

गजबजलेल्या वस्तीत घटना : ताजनगरात खळबळ नागपूर : जनावरांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यांच्या दुचाकीतील साडेआठ लाखांची रोकड लुटारूंनी लंपास केली. मंगळवारी दुपारी ३.४० च्या सुमारास ताजनगरात ही खळबळजनक घटना घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फय्याज कुरेशी रहेमान कुरेशी (वय ३५) हे ताजनगर टेका नाका परिसरात राहतात. ते कळमना मार्केटमधून जनावरे खरेदी करून औरंगाबादला पाठवितात. या व्यवहाराची रक्कम संबंधितांकडून कुरेशी यांच्या बँक खात्यात जमा होते. मंगळवारी दुपारी सिव्हील लाईनमधील आयडीबीआय बँकेत जमा झालेली रक्कम काढण्यासाठी आले. त्यांनी ८ लाख, ५० हजारांची रोकड काढून ती आपल्या अ‍ॅक्टीव्हाच्या दुचाकीत टाकली अन् ही रोकड घेऊन ते आपल्या अ‍ॅक्टीव्हाने घरी पोहचले. दुपारी ३.४० मिनिटांनी घरासमोर अ‍ॅक्टीव्हा उभी केली असतानाच एका दुचाकीवर दोन आरोपी आले. त्यांनी कुरेशी यांना बकरा मंडीतील एका व्यक्तीचा पत्ता विचारला. कुरेशींना गोष्टीत व्यस्त करून दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अ‍ॅक्टीव्हाच्या डिक्कीचे कुलूप तोडून त्यातील रोकड काढून घेतली अन् हे चारही लुटारू पळून गेले. दुचाकीजवळ येताच लुटारूंनी आपली रोकड पळविल्याचे कुरेशींच्या लक्षात आले. त्यांनी लगेच आरडाओरड करीत आरोपींचा पाठलाग केला. मात्र, सुसाट वेगाने दुचाक्या चालवित दोन्ही वाहनांवरून आरोपी पळून गेले. (प्रतिनिधी)बँकेपासूनच पाठलाग जेथे ही घटना घडली तो ताजनगर टेका परिसर अत्यंत गजबजलेला आहे. घटनेच्या वेळीसुद्धा तेथे मोठी गर्दी होती. अशा ठिकाणी अवघ्या दोन-चार मिनिटात आरोपींनी रोकड लुटून नेल्याचे कळाल्याने घटनास्थळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली. माहिती कळाल्यानंतर पाचपावलीचा पोलीस ताफा पोहचला. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून लुटारूंचा मार्ग काढण्याचे प्रयत्न केले. या घटनेनंतर जबर मानसिक हादरा बसलेल्या कुरेशी यांना पोलिसांनी प्रदीर्घ विचारपूस केली. त्यानंतर उपरोक्त आरोपी बँकेपासूनच आपला पाठलाग करीत असल्याचे कुरेशींनी पोलिसांना सांगितले.