शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

शासकीय इमारतींचा लुक बदलणार

By admin | Updated: April 4, 2017 01:50 IST

राज्यसरकारने नागपुरातील शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी १६७.४३ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली.

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा पुढाकार : १६७.४३ कोटी मिळणार नागपूर : राज्यसरकारने नागपुरातील शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी १६७.४३ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष प्रयत्नांनी हा निधी मंजूर झाला आहे. मुंबईला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पाच कोटींपेक्षा अधिक किमतीच्या इमारतींसाठीच्या बांधकामांना मंजुरी देण्यासाठी सचिव समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला २१ विभागांचे सचिव उपस्थित होते.शहरासह जिल्ह्यातील शासकीय इमारती तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मेयो हॉस्पिटलच्या बांधकामांचा यात समावेश आहे. तसेच काटोल, हिंगणा, कोंढाळी आणि कुही येथे पोलीस अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने तसेच अजनी येथे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची निवासस्थाने व विधानभवन नागपूर विस्तारित इमारत क्रमांक २ चे नूतनीकरण व दोन मजली इमारत बांधकाम ही कामे या निधीतून केली जाणार आहेत. या निधीसाठी जिल्ह्यातील भाजपाच्या आ. सुधीर पारवे, आ. समीर मेघे, आ. आशिष देशमुख, आ. मल्लिकार्जुन रेड्डी यांनीही पाठपुरावा केला होता. तर शहरातील मेडिकल कॉलेज इमारतींसाठी निधीचा पाठपुरावा आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे यांनी केला होता.(प्रतिनिधी)या कामांसाठी निधी मंजूर काटोल येथे पोलिस अधिकारी-कर्मचारी निवासस्थानांसाठी ५८१ लक्ष, हिंगणासाठी ८२३ लक्ष, कोंढाळीसाठी ५४२ लक्ष, कुहीसाठी ८३७ लक्ष रुपये मंजूर केले आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय राजाबाक्षा धोबीचाळ अजनी येथे डी टाईप तसेच वर्ग ४ च्या निवासस्थानांचे बांधकामासाठी ८४१ लक्ष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे निवासी डॉक्टरांसाठी २५० क्षमतेचे नवीन वसतिगृह ४३०२ लक्ष आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम ७७६४ लक्ष आणि विधान भवन विस्तारित इमारतीचे नूतनीकरण आणि दोन मजली इमारत बांधकामासाठी १०५४ लक्ष रुपये या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत.