शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जोपर्यंत जातीभेद तोपर्यंत आरक्षण

By admin | Updated: September 28, 2015 03:14 IST

आरक्षणाचा आधार हा आर्थिक नसून सामाजिक असमानता आहे. भारतात ही असमानता जातीशी संबंधित आहे आणि जातीव्यवस्था ही धर्माशी संबंधित असल्याने ती घट्ट चिकटून बसलेली आहे.

आरक्षण परिषद : सुखदेव थोरात यांचे रोखठोक मत नागपूर : आरक्षणाचा आधार हा आर्थिक नसून सामाजिक असमानता आहे. भारतात ही असमानता जातीशी संबंधित आहे आणि जातीव्यवस्था ही धर्माशी संबंधित असल्याने ती घट्ट चिकटून बसलेली आहे. त्यामुळे समाजात अजूनही जातीभेद पाळला जातो. हा जातीभेद नष्ट झाला तरच असमानता दूर होऊ शकते. त्यामुळे समाजात जोपर्यंत जातीभेद आहे तोपर्यंत आरक्षण हवेच, असे रोखठोक मत इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च नवी दिल्लीचे चेअरमन डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी आयोजित आरक्षण परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. फोरमचे संस्थापक अध्यक्ष ई.झेड. खोब्रागडे अध्यक्षस्थानी होते तर फुले-आंबेडकरी विचारवंत प्रा. हरी नरके व प्रा. देवीदास घोडेस्वार हे प्रमुख अतिथी होते. डॉ. थोरात म्हणाले, सर्वच समाजात गरीब लोक आहेत. गरिबीचे कारण जवळपास सारखेच आहे. परंतु अस्पृश्य समाजातील लोकांच्या गरिबीचे कारण आणि प्रश्न मात्र जातीशी संबंधित आहेत. खासगी क्षेत्रातील परिस्थिती अतिशय वाईट आहे. खासगी क्षेत्रातील नोकर भरतीमध्ये सर्वाधिक जातीभेद पाळला जातो. त्यामुळे खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे, ही मागणी लावून धरण्याची गरज आहे. यासोबतच दलितांच्या स्वतंत्र वसाहती, स्वतंत्र मतदार संघ आणि हजारो वर्षांपासून ज्या समाजाचे अधिकार नाकारण्यात आले, त्या समाजाला नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढे रेटण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. थोरात म्हणाले. ई.झेड. खोब्रागडे यांनी आरक्षणाचे धोरण व अंमलबजावणीचा आढावा मागण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रा. घोडेस्वार यांनी संविधान सभेतील आरक्षणावरील चर्चेवर प्रकाश टाकला. शिवदास वासे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. टी.बी. देवतळे यांनी प्रास्ताविक, सच्चिदानंद दारुंडे यांनी संचालन तर विलास सुटे यांनी आभार मानले. राजरतन कुंभारे, ललित खोब्रागडे, डॉ. अनिल हिरेखण आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)