शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

लंडनच्या फेसबुक फ्रेण्डने गंडविले

By admin | Updated: July 30, 2016 02:21 IST

फेसबुक फ्रेण्डने एका महिलेला महागड्या भेटवस्तू देण्याच्या नावाखाली ७५ हजारांचा गंडा घातला.

महागड्या भेटवस्तूचे आमिष : ७५ हजार हडपले नागपूर : फेसबुक फ्रेण्डने एका महिलेला महागड्या भेटवस्तू देण्याच्या नावाखाली ७५ हजारांचा गंडा घातला. त्याची बनवाबनवी लक्षात आल्यानंतर लिली सुनील यादव (वय ५६, रा. गणेशपेठ) या महिलेने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. डॉ. चार्ली डे ड्रीक आणि रेली अँगल (रा. लंडन युनायटेड किंगडम) अशी आरोपींची नावे आहेत. लिली यादव यांची डॉ. चार्ली सोबत महिनाभरापूर्वी फेसबुकवर ओळख झाली. फेसबूक फ्रेण्ड बनल्यानंतर ते नंतर एकमेकांच्या आॅनलाईन संपर्कात आले. लिली यादव यांची आणि परिवाराची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आरोपीने यादव यांना मैत्रीखातर काही भेटवस्तू देण्याची इच्छा व्यक्त केली. सोन्याचे दागिने आणि महागडा आयफोन अशा या कथित भेटवस्तू राहील, असेही सांगितले. काही दिवसानंतर यादव यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्यात दिल्ली युनियन बँकेच्या ३४९९०२०१००४५९३५ या खात्यात ७५ हजार रुपये जमा करा आणि आपले पार्सल घेऊन जा, असा फोन आला. त्यामुळे यादव यांनी नमूद खात्यात ७५ हजार रुपये जमा केले. पुन्हा काही वेळेनंतर त्यांना तसाच फोन आला. ७५ हजार रुपये पुन्हा जमा करा आणि पार्सल घेऊन जा, असे आरोपीने सांगितले. त्यामुळे यादव यांनी काही हितचिंतकांशी चर्चा केली. चर्चेनंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी लकडगंज ठाण्यात धाव घेतली. २८ जून ते २८ जुलै दरम्यानचे आॅनलाईन संभाषण, मेसेज आणि अन्य पुरावे दाखविल्यानंतर लकडगंज पोलिसांनी आरोपी डॉ. चार्ली डे ड्रीक आणि रेली अँगल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)