शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतचा इशारा खरा ठरला; आयएसआय सक्रिय झाल्याचे दिले होते वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 10:44 IST

सावधान...! फेसबुकवर जास्त अ‍ॅक्टिव्ह राहत असाल तर तुम्ही शत्रू राष्ट्राच्या गुप्तचर संस्थेने पेरलेल्या व्यक्तीकडून टार्गेट केले जाऊ शकता. असे वृत्त लोकमतने ५ आॅक्टोबर २०१८ च्या अंकात प्रकाशित केले होते.

ठळक मुद्देफेसबुक फ्रेण्ड हेरगिरी करवून घेऊ शकतो

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सावधान...! फेसबुकवर जास्त अ‍ॅक्टिव्ह राहत असाल तर तुम्ही शत्रू राष्ट्राच्या गुप्तचर संस्थेने पेरलेल्या व्यक्तीकडून टार्गेट केले जाऊ शकता. असे झाले तर तुम्हाला हेरगिरीच्या आरोपात अटकही होऊ शकते, असे वृत्त लोकमतने ५ आॅक्टोबर २०१८ च्या अंकात प्रकाशित केले होते.भारताच्या उण्यावर असलेल्या पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयकडून हा प्रयोग केला जात आहे, असेही लोकमतने या वृत्तात म्हटले होते. निशांत अग्रवालला मिलिटरी इंटेलिजन्स आणि यूपी एटीएसने अटक केल्यानंतर हे वृत्त अक्षरश्: खरे ठरले.सोशल मीडियाच्या प्रेमात तरुणाई वेडावल्यागत वागत आहे. ज्याचे प्रत्यक्षात कधी तोंड बघितले नाही आणि ज्याला भविष्यात प्रत्यक्ष कधी भेटण्याची शक्यता नाही, अशी मंडळीसोबत अनेक जण रोज आॅनलाईन संपर्कात राहतात. फेसबुकवर दिसणाऱ्या आकर्षक चेहºयावर भाळून त्याच्यासोबत तासन्तास चॅटिंग करतात. त्यांच्यासोबत संवेदनशील माहितीचे आदानप्रदान करतात. फेसबुकची चलती बघून शत्रू देशाच्या गुप्तचर संस्थांनी हेरगिरीसाठी विशिष्ट जणांना टार्गेट करणे सुरू केले आहे. आकर्षक चेहरा अन् प्रभावी प्रोफाईल (फेक आयडी) अपलोड करून संवेदनशीलस्थळी काम करणाºया व्यक्तीला शत्रू राष्टाचा हेर आॅनलाईन जाळ्यात गुंतवतो आणि त्याच्याकडून नियमित पाहिजे ती संवेदनशील माहिती बेमालूमपणे काढून घेतो. पाकिस्तानी आयएसआयची ही पद्धत आहे. बनावट नावाने फेसबुक आयडी तयार करून बीएसएफ जवान अच्युतानंद मिश्राला अशाच पद्धतीने आयएसआय एजंटने जाळ्यात ओढल्याचेही या वृत्तात सविस्तरपणे प्रकाशित केले होते.लोकमतचे हे वृत्त प्रकाशित होऊन तीन दिवस झाले अन् चौथ्या दिवशी पाकिस्तान तसेच अमेरिकेला शक्तिशाली ब्रह्मोस मिसाईलचा डाटा देण्याच्या आरोपाखाली निशांत अग्रवालच्या नागपुरात एटीएसने मुसक्या बांधल्या. फेसबुकच्या माध्यमनातूनच त्याला टार्गेट करण्यात आले होते. त्याच्यावर आयएसआयने तसाच लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तासारखाच ट्रॅप लावला होता.

लोकमतचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरलया कारवाईने नागपूरच नव्हे तर संपूर्ण सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. हा एकच विषय नागपुरात गेल्या चार दिवसांपासून चर्चेला आहे. लोकमतने कारवाईच्या चार दिवसांपूर्वीच आयएसआय सक्रिय झाल्याचे तसेच फेसबुक फ्रेण्ड हेरगिरी करवून घेऊ शकतो, हे वृत्त दिले होते त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. लोकमतच्या वृत्ताचे कात्रणही सोशल मीडियावर अनेकांनी व्हायरल केले आहे.

टॅग्स :Brahmos Missileब्राह्मोस