शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

लोकमतचा शानदार विजय

By admin | Updated: January 23, 2016 02:54 IST

लोकमतने देशोन्नतीवर नऊ गड्यांनी शानदार विजय नोंदवित शुक्रवारी १८ व्या एसजेएएन- ओसीडब्ल्यू आमंत्रित आंतरप्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली.

शरद मिश्राची चमकदार कामगिरी नागपूर : लोकमतने देशोन्नतीवर नऊ गड्यांनी शानदार विजय नोंदवित शुक्रवारी १८ व्या एसजेएएन- ओसीडब्ल्यू आमंत्रित आंतरप्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. स्पोर्टस् जर्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आजच्या दुसऱ्या सामन्यात लोकशाही वार्ता संघाने तरुण भारतचा २७ धावांनी पराभव केला.दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या देशोन्नतीला २० षटकांत सर्वबाद ८९ धावांत गुंडाळल्यानंतर लोकमतने विजयी लक्ष्य ९.५ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात गाठले. देशोन्नतीकडून अक्षय माटेगावकर २९ आणि सचिन कांचनवार १७ यांनी थोडाफार प्रतिकार केला. शरद मिश्रा, देवेन सदावर्ती आणि प्रवीण लोखंडे यांनी लोकमतकडून प्रत्येकी दोन गडी बाद केले. शरद मिश्रा याने ३९ चेंडूत नऊ चौकारांसह ५९ धावा ठोकल्या. कर्णधार अमित खोडके याने नाबाद २३ धावांचे योगदान दिले. मिश्रा सामनावीर ठरला. वसंतनगर मैदानावर लोकशाही वार्ताने ९ गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा उभारल्या. त्यात मधल्या फळीतील निखिल केळापुरे याच्या दहा चौकारांसह काढलेल्या ६० धावा प्रमुख ठरल्या. अभिषेक कुलकर्णी २६ आणि सचिन कडबे २३ यांनीही आक्रमक फलंदाजी केली. तरुण भारत संघाचा डाव ७ बाद १४५ धावांत थांबला. नितीन बैतुले ४६, मन्नू बावा ३७ आणि अंकुश हिवराळे १७ यांनी धावा केल्या पण अन्य फलंदाज अपयशी ठरले. केळापुरे सामन्याचा मानकरी ठरला. त्याआधी सकाळी आ. गिरीश व्यास यांच्याशीे दोन्ही संघांचा परिचय करून देण्यात आला. आज शनिवारी लोकमत विरुद्ध दै. भास्कर हा सामना वसंत नगर मैदान येथे सकाळी ९.३० पासून तसेच टाइम्स आॅफ इंडिया विरुद्ध तरुण भारत हा सामना डॉ. आंबेडकर कॉलेज मैदानावर सकाळी १०.१५ पासून खेळविला जाईल. (क्रीडा प्रतिनिधी)