शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
6
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
7
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
8
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
9
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
10
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
11
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
12
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
13
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
14
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
15
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
16
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
17
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
18
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
19
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
20
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

लोकमतचा रंगतदार उपक्रम : झुंबा डान्स, लगोरी, रस्सीखेचचा माहोल

By admin | Updated: May 11, 2015 02:12 IST

आठवड्याभराचा थकवा उठूच देत नाही साखरझोपेतून. आजचा रविवार मात्र याला अपवाद ठरला.

नागपूर : नागपूरकरांची रविवारची सकाळ तशी आळसलेली असते. आठवड्याभराचा थकवा उठूच देत नाही साखरझोपेतून. आजचा रविवार मात्र याला अपवाद ठरला. ‘लोकमत धम्माल गल्ली’ त सहभागी व्हायचेच असा निर्धार करून झोपलेले नागपूरकर सकाळी ६ च्या ठोक्याला काँग्रेस नगरातील धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानात गोळा व्हायला लागले. एक ६५ वर्षांचा ‘तरुण’ आधी मैदानात आला अन् आपल्या विशिष्ट शैलीत नृत्य करायला लागला. त्याचवेळी निरंजन बोबडे यांच्या ‘आई भवानी’ च्या जागराने जोष चढवला, अन् त्याचा नृत्याचा ज्वर इतरांनाही चढला. आबालवृद्धांपासून तरुण-तरुणींपर्यंत सर्वांनीच फेर धरला, पाहता-पाहता अख्खे मैदान थिरकायला लागले. त्यानंतर झुंबा डान्स, लगोरी, रस्सीखेच, दोरीवरच्या उड्या, योगासने, गिटारवादन, अंगाभोवती रिंग फिरविणे, एक टप्पा क्रि केट, फुटबॉल, जादूचे खेळ, सापशिडीचा खेळ, बाईक्सी, सेल्फीचा आनंद, क्ले-आर्ट, लॅण्डस्केप असे एक ना अनेक खेळ, उपक्र म उपस्थितांना छंद पाहायला आणि अनुभवायलाही मिळाले. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद करणाऱ्या सृष्टी शर्मा हिने ‘लिंबो स्केटिंग’च्या थरारक प्रात्यक्षिकांनी दर्शकांना खिळवून ठेवले. सलग तीन तास ‘लोकमत धम्माल गल्ली’ त असे फूल टू फन सुरू होते. या कार्यक्रमासाठी धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ.बबनराव तायवाडे यांचे सहकार्य मिळाले.स्केटिंगचा थरार अन् क्रिकेटचा षट्कार‘रुटीन’च्या जरा पलीकडे जाऊन थोडा वेळ मनासारखे जगण्याची संधी आबालवृद्धांना मिळावी, यासाठीे ‘लोकमत’च्या वतीने रविवारी ‘धम्माल गल्ली’चे आयोजन करण्यात आले होते. नागपूरकरांनी या संधीचे सोने करीत या ‘धम्माल गल्ली’ त खरच धम्माल केली. पहाटे ६ वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली. बच्चे कंपनी आजी-आजोबा आणि आई-बाबांचा हात धरून आधीच डीएनसी कॉलेजच्या मैदानात पोहोचली होती. घरूनच आणलेली बॅटमिंटनची रॅकेट, बॅट, बॉल आणि स्टम्प घेऊन जागा मिळेल तेथे चौकार, षट्कारांची बरसात सुरू झाली. मध्येच स्केटिंग ग्रुपचे जल्लोषात आगमन झाले. उत्साही बाल-गोपाल आणि तरुणही स्केटिंगची प्रात्याक्षिके दाखवत इकडे-तिकडे पळत होते. महिलांनी आपल्या परीने कार्यक्र माची रंगत वाढविली आणि आनंद लुटला. दोरीवरच्या उड्या, लगोरी व बेधुंद नृत्यावर धरलेला ताल यामुळे कार्यक्र म चांगलाच बहरला. नागपूरचे प्रसिद्ध गायक निरंजन बोबडे, सागर मधुमटके, मंजिरी वैद्य यांच्या गीत सादरीकरणाने या जल्लोषात मोठीच भर पडली. झुम्बा डान्स ‘धम्माल गल्ली’चे वैशिष्ट्य ठरले. चिमुकल्या मुलींनी क्ले-आर्ट, क्राफ्टच्या मदतीने तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू व ‘लोकमत’ची भव्य रांगोळी आकर्षणाचे केंद्र ठरले. यावेळी मैदानात फुटबॉलचा डावही रंगला. नागपूरकरांनी आपल्या कुटुंबासह रविवारची अनोखी सकाळ एका नव्या पद्धतीने एन्जॉय केली. प्रमेय लोखंडे यांच्या बहारदार निवेदनाने या उपक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आकर्षक ‘लोकमत’ रांगोळी धमाल गल्लीमध्ये कुणी संगीताच्या तालावर थिरकले, कुणी खेळ खेळला, कुणी सायकल चालविली तर कुणी विविध कला शिकण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक इवेंट हा काही तरी नवीन होता. यातच लोकमतचेच कर्मचारी असलेले रांगोळी कलावंत प्रशांत कुंडलकर यांनी काढलेली लोकमत रांगोळी ही विशेष आकर्षण ठरली. यावेळी विभा भोंडे, निता भोंडे, मंजुषा थोटे, रंजना चंदेल, राधा अतकरी आणि ग्रुपने संस्कार भारतीसह अनेक विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या.जादूगार राजू ‘दी ग्रेट’ जादूगार राजू गाईनकर यांनी आपल्या जादूच्या प्रयोगांनी उपस्थित लहान मोठ्यांचे मनोरंजन केले. त्यांच्या जादूच्या विविध प्रयोगांना प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. विशेष म्हणजे पत्त्यांच्या खेळातील विविध प्रकारच्या जादूंनी उपस्थित आश्चर्यचकित झाले. ‘कलाकार’ गिटार ग्रुपने रिझवलेकलाकार गिटार ग्रुप या संगीतवेड्या तरुणाच्या ग्रुपने गिटारवर आधाारित मेलोडियस गाणे सादर करून तरुणाईला मंत्रमुग्ध केले. या ग्रुपमध्ये शुभांकित बाराहाते, अक्षय रामटेके, रचित मेश्राम, निखील लांजेवार, प्रशांत मोटघरे, अभिनय रामटेके, हर्षीत फुलझेले, पवन चव्हाण या तरुणांचा समावेश होता. लॅण्डस्केप ग्रुपचाही ‘धमाल’ स्ट्रोकशहरातील विविध भागात जाऊन तेथील सौदर्य ‘लॅण्डस्केप’ मध्ये टिपणाऱ्या या लॅण्डस्केप ग्रुपने रविवारी धमाल गल्लीत आपल्या कुंचल्यातून निसर्ग चित्राचे रेखाटन केले. धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या धमाल गल्लीचे चित्र या ग्रुपने काढले अन् त्यात मस्तीचे रंगही भरले. या ग्रुपमध्ये जयंत आष्टनकर, दिलीप भालेराव, विजय अनसिंगकर, डॉ.विजय काकडे, घनशाम डोंगरवार, दीपक सोरते, गिरीश टोळ व श्रास्तकार यांनी आपला सहभाग नोंदविला. वॉटर कलर्सच्या माध्यामातून या ग्रुपने एका तासात एक सुंदर निसर्ग चित्र तयार केले. रॉक स्टाईल कपडे अन् मानेवर गिटारयुवकांचे आवडते संगीत म्हणजे रॉक बॅण्ड. धमाल गल्लीत आपल्यातील संगीतमय ऊर्जा घेऊन बारुद व धोका या बॅण्डच्या ग्रुपने युवकांना आपल्या तालावर नाचण्यास भाग पाडले. अभिषेक, सुष्मीत, अजिंक्य विकास, वैभव, वैद्य, डोडो, अनिकेत आकाश या तरुणांंनी एकापेक्षा एक धमाल गाणी आपल्या शैलीत संगीतबद्ध करुन गायलीत. रॉक स्टाईल कपडे अन् मानेवर गिटार ठेवून आपले कौशल्य दाखविले. या कार्यक्रमाची सुरेल शेवट ही ‘मदर्स डे’ निमित्त ‘तुझे सब है पता है ना माँ ’ या गीताने झाली.सृष्टीच्या ‘लिंबो स्केटिंग’ मुळे वाढली धडधड लोकमतच्या पुढाकारामुळे स्केटिंगपटू सृष्टी शर्मा या चिमुकलीने वर्षभरापूर्वीच ‘लिंबो स्केटिंग’ या प्रकारात गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला होता. रविवारी लोकमतच्या धमाल गल्लीत सृष्टी पुन्हा एकदा आपल्या आई-वडिलांसोबत सहभागी झाली होती. यावेळी तिने शेकडो लोकांच्या उपस्थित लिंबो स्केटिंगचा तो विक्रमी प्रकार एक दोनदा नव्हे तर अनेकदा करून दाखविला. सृष्टीद्वारा सादर करण्यात येत असलेला हा लिंबो स्केटिंगचा थरार शेकडो नागपूरकरांनी प्रत्यक्ष अनुभवला. यासोबतच धमाल गल्लीमध्ये उज्ज्वल स्केटिंग अकादमीतर्फे प्रशिक्षक कुणाल दांडेकर, विशाल वानखेडे, राकेश रोटके, निखील इरपाते यांच्या नेतृत्वात प्रथम पुरोहित, संकेत साकोरे, जया साकोरे, वेदांत लालमोंडे, सार्थक गाडगीळ, विशाल गौर, अथर्व वऱ्हाडे, देवांश बिहाऊट, स्वरा कनेकर, शिवांग गौर आदी सहभागी झाले होते. त्यांनी मनसोक्त स्केटिंग करून स्वत: तर आनंद लुटलाच सोबत इतरांचेही मनोरंजन केले.