शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

कम्फर्ट झोन सोडलाच नाही तर आकाश भरारी कशी घेणार? - लोकमत वुमेन समिटच्या व्यासपीठावर शोध नव्या उमेदीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 17:01 IST

Lokmat Women Summit 2022 : आपला कम्फर्ट सोडला तर जगण्याची नवी दिशा आणि भरारीसाठी नवीन आकाश गवसेल, लोकमत वुमेन समिटच्या व्यासपीठावर महिलांच्या क्षमतांचा जागर

ठळक मुद्दे काय केलं तर बायकांना त्यांचं अवकाश गवसेल ?

लोकमत वुमेन समिटच्या( Lokmat Women Summit 2022) व्यासपीठावर चर्चा सुरु होती, महिलांनी मुक्तपणे सामर्थ्यशाली जीवन जगण्याची. ‘पंछी बनू’ म्हणत आपल्या साऱ्या क्षमतांसह कर्तृत्वाचं आकाश सर करण्याची. अभिनेत्री ईशा कोप्पीकर, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेण्टरच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर आणि एलोपेशिया आजारासंदर्भात जनजागृती करणाऱ्या कार्यकर्त्या केतकी जानी लोकमत वुमेन समिटच्या विशेष संवादात सहभागी झाल्या होत्या. काय केलं तर बायकांना त्यांचं अवकाश गवसेल या प्रश्नाभोवती चर्चा सुरु असताना सर्वांनी एकमतानं सांगितलं, बायकांनी आधी त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला हवं. नवी आव्हानं स्वीकारताना स्वत:वर भरवसा ठेवायला हवा.अभिनेत्री ईशा कोप्पीकर म्हणाली, मुळात आपण हे मान्यच करुन टाकू की हे जग पुरुष प्रधान आहेच. मग क्षेत्र कोणतेही असो, फक्त सिनेइंडस्ट्रीच कशाला, सर्वच क्षेत्र. त्यामुळे पुरुषांशी सतत महिलांची तुलना आणि स्पर्धा आता आपण बंद करुन टाकली पाहिजे. मुळात स्वत:ला हे सांगितलं पाहिजे की आपण जन्मत: सबल-स्वतंत्र आहोत. आपल्याला कोण काय सबलीकरणाचे धडे देणार? आपण आपली ताकद आणि आपलं स्वातंत्र्य ओळखलं पाहिजे. तशी उमीद ठेवली पाहिजे.

उमीद म्हणजे नेमकं काय याचं तंतोतंत उदाहरण एलोपेशिया आजारासंदर्भात काम करणाऱ्या केतकी जानी व्यासपीठावर उपस्थित होत्या. केसात चाई पडल्यानं सगळे केस गेले. तोंड लपवून डिप्रेशनमध्ये पाच वर्षे घरात घातल्यावर आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत त्या जाऊन आल्या. पण मग आपल्या मुलांचे चेहरे आठवत त्यांनी जगायचं ठरवलं. त्या सांगतात, एलोपेशिया या आजारापायी किती महिला-मुली आत्महत्या करतात. घरात कोंडून घेतात स्वत:ला. आत मला वाटतं, आपण काय लोकांना सुंदर दिसण्यासाठी, त्यांना एंटरटेन करण्यासाठी आहोत का? मला लोक टकली म्हणतात, तू काय पाप केलंस म्हणतात, हे सारं ऐकून घेऊनही जगायचं आनंदानं. ’ सांगता सांगता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तसं सारं चर्चासत्र भावूक झालं. मात्र जगण्याची त्यांची उमेद सगळ्यांना अतिशय सुखावून गेली.पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर म्हणाल्या, महिलांना काम करताना स्वत:ला वारंवार सिध्द करावं लागतं. दुप्पट काम करावं लागतं पुरुषांपेक्षा. आव्हाने येतातच, पुरुषांनाही येतात. मात्र यासाऱ्यातून भरारी घ्यायची तर कुटुंबाची साथ हवी. अवतीभवती तसं वातावरण हवं, महिला महिलांचं बॉण्डिंग हवं आणि मुख्य म्हणजे सिस्टरहूड तयार व्हायला हवं. त्यातून पोषक वातावरण घडत जाईल. महिलांनीही सुपरवूमन बनायचा अट्टहास यसोडून आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं मनापासून जगावं. आनंदाला मूरड घालू नये.’हेच सूत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेण्टरच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर मांडतात. त्या म्हणतात, ‘महिला उद्योजक म्हणजे लोणची पापड मसाले एवढेच उद्योग असं कशाला? मोठे उद्योग असावे, प्रयोग करावे, मोठी गुंतवणूक असावी अशी स्वप्न पहावी त्यादिशेनं प्रयत्न करायला हवेत. आजही यशस्वी महिलेलाही विचारले जाते, तुझा नवरा काय करतो? कशासाठी? आजही उच्चशिक्षणात महिलांचं प्रमाण कमी आहे. हे का? यासाऱ्यातून वाट शोधायची तर महिलांनी आपला कम्फर्ट सोडून नवीन आव्हानं पेलली पाहिजे.’आव्हानं स्वीकारुन आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्याचं सूत्र देत हा संवाद थांबला तेव्हा अनेकींच्या नजरेसमोर आपल्या क्षमतांचं बळ नक्की उभं होतं.

टॅग्स :Lokmat Women Summitलोकमत वुमेन समीट