शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

लोकमत महामॅरेथॉनचा रविवारी थरार; राज्यातील धावपटूंसह हजारो नागपूरकरांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 10:13 IST

११ फेब्रुवारीचा दिवस नागपूरकरांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. निमित्त असेल भोजवानी फूडस् प्रस्तुत ‘नागपूर महामॅरेथॉन’चे. कस्तूरचंद पार्क येथून रविवारी (११ फेब्रुवारी) महामॅरेथॉनला सकाळी ६.३० वाजता सुरुवात होईल.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी आणि अधिकारीही धावणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ११ फेब्रुवारीचा दिवस नागपूरकरांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. या दिवशी सळसळता उत्साह असणाऱ्या तब्बल साडेसात हजार धावपटूंच्या सहभागामुळे येथील रस्ते ओसंडून वाहताना दिसणार आहेत. निमित्त असेल भोजवानी फूडस् प्रस्तुत ‘नागपूर महामॅरेथॉन’चे. ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क येथून रविवारी (११ फेब्रुवारी) महामॅरेथॉनला सकाळी ६.३० वाजता सुरुवात होईल.गडकरी दाखविणार हिरवी झेंडीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुख्य उपस्थितीत होणाºया सोहळ्यात नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधीर पारवे, आ. आशिष देशमुख, आ. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, आ. गिरीश व्यास, आ, परिणय फुके, आ. जोगेंद्र कवाडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी महापौर विकास ठाकरे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, मनपा अप्पर आयुक्त रवींद्र कुंभारे, सीआरपीएफचे कमांडंट मोहनदास खोब्रागडे तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतिजा आदी पाहुणे उपस्थिती दर्शविणार आहेत.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धावपटूंचा सहभाग तसेच सर्व संरक्षक दले, पोलीस, होमगार्ड आणि विशेष दलातील धावपटूंसाठी विशेष दिले जाणारे बक्षीस हेदेखील प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे.२१ कि.मी. अर्धमॅरेथॉन, तर १० कि.मी. ‘पॉवर रन’ शिवाय फॅमिली व ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ कि .मी. फन रन आणि ५ कि .मी. अंतर अशा विविध चार गटात आयोजन करण्यात येत आहे.लोकमत समूहाने यंदा महाराष्ट्रात चार शहरात महामॅरेथॉनचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील धावपटूंच्या उदंड प्रतिसादामुळे नाशिक तसेच औरंगाबाद येथील महामॅरेथॉनमध्ये हजारो धावपटूंनी सहभाग निश्चित केला होता.नागपुरात रंगणारी महामॅरेथॉन नागरिक आणि खेळाडूंसाठी एक संस्मरणीय अनुभवाचा ठेवा ठरणार आहे. सर्व शहर या मॅरेथॉननिमित्त एकत्रित यावे, आपापसात जिव्हाळा निर्माण व्हावा, मैत्री वृद्धिंगत व्हावी, शहरात एकोपा वाढावा हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकमत समूहाने ही महामॅरेथॉन आयोजित केली आहे.लोकप्रतिनिधी, मान्यवर धावणारलोकमत महामॅरेथॉनमध्ये मान्यवर लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवर सनदी अधिकारी धावणार आहेत. त्यात रामटेकचे खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, महानगर पालिका आयुक्त अश्विन मुद्गल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या अतिरिक्त अधीक्षक मोनिका राऊत आदींचा प्रामुख्याने समावेश राहील.दिव्यांग रन सकाळी ७.४५ वाजतालोकमत महामॅरेथॉन स्पर्धेत एक किलोमीटरची दिव्यांग रन होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात सकाळी ७.४५ वाजता होईल. या स्पर्धेत विविध संस्थांचे १०० विद्यार्थी, शिक्षक सहभागी होणार असून त्याता ६ ते ५५ वर्षे वयोगटातील व्यक्तींचा सहभाग असणार आहे.