शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

लोकमतने खऱ्या अर्थाने नागपूरमध्ये क्रीडा संस्कृती रुजवली; प्रल्हाद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 11:42 AM

खेळाडू ते क्रीडा संघटक या माझ्या पाच दशकांहून अधिक काळाच्या वाटचालीत लोकमतचा मोठा वाटा आहे. अर्थात खेळाडू म्हणून पहिली थाप पडली ती नागपूर लोकमतची.

ठळक मुद्देआॅलिंपिकसाठी खेळाडू घडविण्याची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:खेळाडू ते क्रीडा संघटक या माझ्या पाच दशकांहून अधिक काळाच्या वाटचालीत लोकमतचा मोठा वाटा आहे. अर्थात खेळाडू म्हणून पहिली थाप पडली ती नागपूर लोकमतची. त्यावेळच्या पुणे विभागीय संघातून नागपूरला आम्ही ‘शेरे पंजाब’ स्पर्धेसाठी गेले असताना विजयी झालो. बाबूजी दर्डा प्रमुख पाहुणे होते. त्यांनी आमचा लोकमतमध्ये छापलेला फोटो क्रीडा आयुष्यातील पहिला होता. साधारण सत्तरीचा काळ होता. वर्तमानपत्रात खेळाच्या चार ओळी येणे मुश्कील होते. त्या काळातील ही आठवण.त्यानंतर लोकमतने खेळाला भरभरून साथ दिली. ती देताना स्पर्धा कोण भरवते? जिंकते कोणते गाव? त्याचा कधीच विचार केला नाही, अशी निर्भेळ पत्रकारिता आता तर अवघड आहे. लोकमतने खऱ्या अर्थाने नागपूरमध्ये क्रीडा संस्कृती रुजवली. मग ती क्रिकेटमध्ये असो किंवा मॅरेथॉन. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच नागपूरसारख्या शहरात १६ आंतरराष्ट्रीय महिला धावपटू निर्माण झाल्या, असे म्हटले तर गैर ठरू नये. नागपूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा सतत तीन वर्षे भरवली गेली. तिला दिलेली प्रसिद्धी कौतुकास्पद होती.राष्ट्रकुल युवा क्रीडा बॅटन किंवा १९९४ सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची ज्योत असो लोकमत नागपूरने संपूर्ण विदर्भात एखाद्या झंझावातासारखा प्रचार व प्रसार केला होता. त्यामुळे गावोगावी स्वागतासाठी क्रीडारसिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.आता महाराष्ट्रात औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक येथे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचा नवा उपक्रम लोकमत समूहाने हाती घेतला आहे. लाखो रुपयांची पारितोषिके, करंडक, टीशर्ट अशा खेळाडूंसाठी त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामधून आॅलिम्पिक वीर घडावे, अशी धारणा नाही. पण समाजात क्रीडा संस्कृती निर्माण व्हावी. तळागाळापर्यंत क्रीडाभावना जोपासली जावी. आजचा युवा वर्ग जो दूरचित्रवाणीला खिळून मैदानापासून दूर गेला आहे, तो पुन्हा मैदानावर परतावात्यांची अपेक्षा असावी. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या निमित्ताने ग्रामीण भागातील आॅलिम्पिकवीर ललिता बाबर, कविता राऊत, आशियायी कुमार विजेती पूजा वऱ्हाडे, भाग्यश्री बिले, चारुलता नायगावकर आदी पुढे येऊन आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये चमकल्या. तशाच लोकमतच्या मॅरेथॉन स्पर्धेतून विदर्भातील १३ जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी खेळाडू पुढे याव्यात लोकमत नागपूरने त्यांना एक नवे क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्या क्रीडा व्यासपीठाच्या विदर्भातील युवकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. आता सिंथेटीक ट्रॅकही नागपूरात उपलब्ध झाला आहे. अमरावतीसारख्या गावातून १९५५ च्या दरम्यान पुण्यात गेलेला युवक १९६४ सालच्या टोकिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय उच्चांक करून प्रतिनिधित्व करतो. ही गुणवत्ता विदर्भाच्या प्रगतीत आहे. तेव्हा युवकांनो लोकमत मॅरेथॉनची संधी घेऊन विदर्भातून भारताचे आॅलिम्पिक मॅरेथॉन वीर घडवू, हीच सर्वांनी शपथ घेऊ या.

टॅग्स :Lokmat Nagpur Maha Marathon 2018लोकमत नागपूर महामॅरेथॉन २०१८