शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

लोकमत इम्पॅक्ट :  ऊर्जा विभागात होणार महाभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 22:42 IST

Mega recruitment in MAHAGENCO, Nagpur Newsऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत तांत्रिक श्रेणीतील ८५०० पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी दिले. लोकमतने महापारेषणमधील रिक्त पदांसदर्भात वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल शासनाने घेतली, हे विशेष.

ठळक मुद्देमहापारेषणमध्ये ८५०० पदांवर भरती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत तांत्रिक श्रेणीतील ८५०० पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी दिले. लोकमतने महापारेषणमधील रिक्त पदांसदर्भात वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल शासनाने घेतली, हे विशेष.

राज्यात वीज पारेषण कंपनीत तांत्रित श्रेणीतील ८,५०० पदांची ही भरती लवकरच सुरु होईल. यात तांत्रिक संवर्गातील ६७५० पदे व अभियंता संवर्गातील १७६२ पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे. ऊर्जामंत्र्यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. आज मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत उर्जामंत्र्यांनी पदभरती करण्याचे आदेश दिले. नव्याने होण्यार्या या पदभरतीत आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासोबतच अभियांत्रिकी पदवीधरांनाही संधी राहील. यासोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसाार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यासाठी नवीन मंजूर पदाचा आकृतीबंध सादरकरण्याचेही आदेश देण्यात आले आहे.

यंत्रचालक ,तंत्रज्ञ संवर्ग एकत्रीकरण

यंत्रचालक व तंत्रज्ञ संवगार्चे एकत्रीकरण करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. यामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. बदलत्या गरजेनुसार नवीन कौशल्य निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

टॅग्स :jobनोकरीelectricityवीज