शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
5
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
6
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
7
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
8
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
9
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
10
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
11
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
12
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
15
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
16
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
17
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
18
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
19
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
20
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट : नागपूरच्या खामल्यातील अतिक्रमणाचा सफाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 23:16 IST

मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी लक्ष्मीनगर झोन अंतर्गत कारवाई करीत बजाजनगर ते खामला चौक भाजी मार्केटपर्यंत फूटपाथवरील दोन्ही भागतील अतिक्रमणाचा सफाया केला. विशेष म्हणजे लोकमतने येथील अतिक्रमणामुळे नागरिकांना होत असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. यावर मनपा प्रशासनाने तातडीने कारवाई केली.

ठळक मुद्देमनपा अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई१५ शेड, १५ ओटे हटविले, १ ट्रक माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी लक्ष्मीनगर झोन अंतर्गत कारवाई करीत बजाजनगर ते खामला चौक भाजी मार्केटपर्यंत फूटपाथवरील दोन्ही भागतील अतिक्रमणाचा सफाया केला. विशेष म्हणजे लोकमतने येथील अतिक्रमणामुळे नागरिकांना होत असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. यावर मनपा प्रशासनाने तातडीने कारवाई केली. 

अतिक्रमण विरोधी पथकाने अशोक हॉटेलसमोरील रॅम्प तोडले. शुभम गरमेंट्ससमोर अतिक्रमण करून बनवण्यात आलेले ओटेही तोडले. अंबिका एन.एक्ससमोर आणि येथील अनेक दुकानांनी, हॉटेल चालकांनी अतिक्रमण करून बनवलेले ओटे तोडण्यात आले. याप्रकारे एकूण २५ शेड, १५ ओटे तोडण्यात आले. या कारवाईत एक ट्रक माल जप्त करण्यात आला.मनपा अतिक्रमण विरोधी विभागाच्या दुसऱ्या पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कारवाई केली. या पसिरातून २ ट्रक माल जप्त करण्यात आला. या कारवाईत प्रामुख्याने सहायक आयुक्त अशोक पाटील, निरीक्षक संजय कांबळे, नितीन मंथनकर, संजय शिंगणे, जमशेद अली आदी उपस्थित होते.फूटपाथ झाले होते गायब
खामला परिसरात बाजारातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली होती. फूटपाथ तर गायबच झाले होते. वाहन चालकांसह नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. याकडे लोकमतने लक्ष वेधताच येथील अतिक्रमणाचा सफाया झाला. 

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका