शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतची स्पर्धा परीक्षा लेखमाला मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यूपीएससी, एमपीएससी आणि अशा स्पर्धा परीक्षांची अचूक तयारी करता यावी म्हणून लोकमत आणि दि युनिक अकॅडमीने नियमित लेखमाला सुरू केली आहे. बुधवारी विविध शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात लोकमतमधील लेखमालेच्या पानाचे प्रकाशन केले. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाºया या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक होत आहे.हुडकेश्वर येथील सेंट पॉल ...

ठळक मुद्देशिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते उत्साहात प्रकाशन : युनिक करिअर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यूपीएससी, एमपीएससी आणि अशा स्पर्धा परीक्षांची अचूक तयारी करता यावी म्हणून लोकमत आणि दि युनिक अकॅडमीने नियमित लेखमाला सुरू केली आहे. बुधवारी विविध शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात लोकमतमधील लेखमालेच्या पानाचे प्रकाशन केले. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाºया या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक होत आहे.हुडकेश्वर येथील सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय आणि कुकडे लेआऊट येथील न्यू अपॉस्टोलिक इंग्लिश ज्यु. कॉलेज येथे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत लेखमालेचे पान समर्पित करण्यात आले. सुरुवातीला सेंट पॉल शाळेत झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे संचालक राजाभाऊ टाकसाळे, शाळेच्या प्राचार्या देवांगणा पुंडे, पल्लवी गायकी, अरविंद माणके, मोरेश्वर बावणे, नवीन फुलझेले, मेघा वाघमारे, नाझिया शेख आदी शिक्षक तसेच लोकमतचे वरिष्ठ विपणन व वितरण व्यवस्थापक मुश्ताक शेख प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना राजाभाऊ टाकसाळे यांनी करिअरसाठी इंजिनिअर आणि डॉक्टर हा एकमेव पर्याय नसून त्याशिवाय असंख्य वाटा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी निराश न होता यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करून जिल्हाधिकरी, पोलीस आयुक्त किंवा तहसीलदार होण्याचे स्वप्न बघावे, असे आवाहन त्यांनी केले. लोक मत वृत्तपत्रातील चालू घडामोडींची माहिती आणि ही लेखमाला संपूर्ण ज्ञान देण्यासाठी उपयुक्त असून, यामुळे विद्यार्थ्यांना करिअरसाठी नक्कीच लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुश्ताक शेख यांनी यावेळी प्रास्ताविक करताना लेखमालेची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.न्यू अपॉस्टोलिक शाळेत झालेल्या सोहळ्याच्या वेळी शाळेच्या प्राचार्या विनीता बॉवर, मुख्याध्यापिका वंदना बेंझामिन, पर्यवेक्षक मृणालिनी आपटे यांच्यासह स्वाती चांदे, ज्योत्स्ना रागीट, मेधा भांडारकर, शिल्पा आणेराव आदी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना विनीता बॉवर यांनी लोकमतच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. मोबाईल आणि संगणक हॅँग होऊ नये म्हणून त्यांना वारंवार अपडेट करावे लागते. विद्यार्थ्यांचेही ज्ञान अपडेट ठेवण्यासाठी ही लेखमाला अतिशय फायदेशीर आहे.त्यामुळे करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी फाईलमध्ये या लेखमालेचे कात्रण सांभाळून ठेवावे आणि त्यातून अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. लोकमतच्या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.लेखमालेत विद्यार्थ्यांसाठी हे असेलस्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांसाठी या लेखमालेत तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक तसेच यशस्वी उमेदवारांद्वारे विस्तृत विवेचन करण्यात येईल. विषयाचे आकलन, अभ्यासाची पद्धत, संदर्भ साहित्याच्या निवडीसह अचूक मार्गदर्शन तसेच विषय, घटक -उपघटकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा या माध्यमातून करण्यात येईल. स्वयंअध्ययन करणाºया विद्यार्थ्यांनाही या लेखमालेतून पुरेपूर मार्गदर्शन मिळणार असून परीक्षेदरम्यान येणाºया तणावाचे निराकरण करण्याचे आणि वरचा गुणानुक्रम प्राप्त करण्याच्या टीप्स विद्यार्थ्यांना मिळणार आहे.