शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण’

By admin | Updated: August 9, 2016 02:41 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाकडून मोठमोठे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्ष

योगेश पांडे ल्ल नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाकडून मोठमोठे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्ष दिव्याखाली अंधारच असल्याचे अनेकदा दिसून येते. विद्यापीठ ‘आॅनलाईन’ होण्याकडे अग्रेसर असले तरी मूलभूत समस्या कायमच आहे. अद्यापपर्यंत विद्यापीठातील ‘हेल्पलाईन’ सुरू झालेली नाही. परंतु महाविद्यालयांकडून मात्र प्रशासनाला खूप अपेक्षा आहेत. म्हणूनच की काय, सर्व संलग्नित महाविद्यालयांना प्रवेशप्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी २४ बाय ७ ‘हेल्पलाईन’ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागपूर विद्यापीठात गेल्या कित्येक वर्षांपासून ‘हेल्पलाईन’ अस्तित्वात आलेली नाही. विविध वेळी विविध अधिकाऱ्यांनी यासंदर्भात दावे केले. परंतु प्रत्यक्षात सर्व दावे फायलींच्या आतच दबून राहिले. याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणात बसतो. प्रवेश प्रक्रियेच्या वेळी विद्यार्थ्यांना लहानलहान गोष्टींसाठी नाहक पायपीट करावी लागते. प्रशासकीय विभागांनाच हवी ‘हेल्प’ ४विद्यापीठ अनुदान आयोगाने १ जून २०१६ रोजी ‘हेल्पलाईन’संदर्भातील पत्र जारी केले होते. उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.अंजली रहाटगांवकर यांनी ११ जुलै रोजी विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या नावाने पत्र जारी केले. तर उच्च शिक्षण संचालनालयातर्फे १ जुलै रोजी यासंबंधात पत्र जारी करण्यात आले होते. ‘विद्यापीठ’ शब्दच वगळला. परंतु प्रशासकीय कामाच्या संथपणामुळे विद्यापीठाला निर्देश जारी करण्यासाठी ६ आॅगस्टचा मुहूर्त मिळाला. आश्चर्याची बाब म्हणजे आता अनेक ठिकाणी प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण होऊन वर्गदेखील सुरू झाले आहेत.