शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; व्हीव्हीआयपींच्या सभांनी चढणार विदर्भाचा राजकीय पारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 10:40 IST

लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला सर्वच पक्षांकडून सुरुवात झाली असून एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा हा ‘पॉवरपॅक’ राहणार आहे.

ठळक मुद्देएप्रिलचा पहिला आठवडा सभांचा पंतप्रधान वर्धा, तर मायावती, ओवैसी नागपुरात घेणार सभाशहा-प्रियंका येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला सर्वच पक्षांकडून सुरुवात झाली असून एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा हा ‘पॉवरपॅक’ राहणार आहे. ‘व्हीव्हीआयपी’ नेत्यांच्या सभांमुळे राजकीय पारा चढणार आहे. वर्धा-गोंदिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय विविध पक्षांचे राष्ट्रीय नेतेदेखील शहरात येणार आहेत.१ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धा येथून महाराष्ट्रातील प्रचारसभांचा शंखनाद करणार आहेत. ते नागपूरला येतील व येथून वर्धा येथे जातील. यानंतर ४ एप्रिल रोजी गोंदिया येथेदेखील त्यांची सभा होण्याची दाट शक्यता आहे. यासोबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेचेदेखील नागपुरात आयोजन होण्याची शक्यता आहे. शहा यांनी सभेसाठी होकार दिला असून नेमकी तारीख निश्चित व्हायची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात नेमका निर्णय दोन दिवसात होईल असे भाजपाचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांनी सांगितले.दुसरीकडे कॉंग्रेसतर्फे सरचिटणीस प्रियंका गांधी यांची सभा विदर्भात होण्याची शक्यता आहे. मात्र सभास्थान नागपूर असेल की यवतमाळ याबाबत चर्चा सुरू असून अंतिम निश्चिती व्हायची आहे. बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांची सभा ५ एप्रिल रोजी कस्तूरचंद पार्क येथे होणार आहे. बसपाने समाजवादी पक्षासोबत हातमिळावणी केल्याने नागपुरात मायावतींसमवेत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हेदेखील यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची १ एप्रिलला नागपुरात जाहीर सभा होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्यादेखील सभांचे आयोजनदुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचे ४ एप्रिलपासून आयोजन करण्यात आले आहे. ४ एप्रिल, ७ एप्रिल, ८ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या शहराच्या विविध भागात प्रचार सभा होणार आहेत. या कालावधीत भाजपाचे ‘स्टार प्रचारक’देखील नागपुरात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक