शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मतदानासाठी पालकांना विद्यार्थी करणार प्रोत्साहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 10:40 IST

यावर्षी निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचेही सहकार्य घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थी भरून देणार संकल्पपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाही सुदृढ करायची असेल तर मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी मतदानाच्या बाबतीत लोकांच्या मनात कर्तव्यभावना निर्माण करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे, निवडणूक आयोगापासून प्रशासनापर्यंत दरवर्षी विविध माध्यमातून आवाहन करण्यात येते. यावर्षी निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचेही सहकार्य घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात येणार आहे.निवडणूक आयोगाकडून ‘सिस्टीमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अ‍ॅण्ड इलेक्ट्रोरल पार्टीसिपेशन’ (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सरासरीपेक्षा गेल्या काही दिवसांपासून खालावत चालली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे, मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता नैतिक पध्दतीने मतदानाचा हक्क बजवावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकांमध्ये पालकांना मतदानासाठी प्रवृत्त करेल, असे संकल्पपत्र प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांकडून भरून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिल्या आहेत. याअंतर्गत सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांकडून त्यांचे पालक आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील, असे संकल्पपत्र भरुन घ्यायचे आहे. ‘स्वीप’साठी नोडल अधिकारी म्हणून जि.प.च्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांची नेमणूक केली आहे.

संकल्पपत्राचा नमुनासंकल्पपत्रात विद्यार्थ्याला आपले नाव, वर्ग, शाळा लिहायची आहे. याद्वारे संकल्प करतो की, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये माझे पालकांना मतदान करुन राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याकरिता प्रवृत्त करील तसेच माझे परिसरातील अन्य व्यक्तींना देखील मतदान करण्याकरिता प्रवृत्त करीन.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक