शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; काटोलसाठी सेना आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 10:46 IST

काटोल विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी शिवसेनेने दंड थोपटले आहे. युतीत ही जागा सेनेच्या वाट्याला येत असल्याने पोटनिवडणुकीत युतीचा उमेदवार सेनेचाच असला पाहिजे, अशी भूमिका या मतदार संघातील पक्ष पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

ठळक मुद्देपदाधिकारी मातोश्रीवरपक्षप्रमुखांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी शिवसेनेने दंड थोपटले आहे. युतीत ही जागा सेनेच्या वाट्याला येत असल्याने पोटनिवडणुकीत युतीचा उमेदवार सेनेचाच असला पाहिजे, अशी भूमिका या मतदार संघातील पक्ष पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. यासंदर्भात मंगळवारी मुंबई येथे मातोश्रीवर झालेल्या बैठकीत पक्ष अधिकाऱ्यांनी काटोलची पोटनिवडणूक सेनेनेच लढावावी, अशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली. या बैठकीत रामटेक लोकसभा मतदार संघाचाही आढावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. बैठकीला खा.कृपाल तुमाने, माजी आमदार अ‍ॅड.आशिष जयस्वाल, जिल्हा प्रमुख राजेंद्र हरणे, उपजिल्हा प्रमुख पुरुषोत्तम थोटे, उपजिल्हा प्रमुख दिलीप मानकर, देवेंद्र गोडबोले, वर्धमान पिल्ले, तालुका प्रमुख हिंमत नाखले, प्रशांत मानकर उपस्थित होते. इकडे काटोलसाठी भाजपनेही फिल्डिंग लावली आहे. यासंदर्भात इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठीकडे साकडे घातले आहे.शेवटी काटोलबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेनंतर होईल. मात्र जिल्हा भाजपमधील एक गट ही जागा सेनेला सोडावी या विचाराचा तर दुसरा गट २०१४ मधील विजयाचा दाखला देत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक