शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; रामटेकच्या रणभूमीत १० उमेदवार नवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 10:50 IST

रामटेकच्या रणभूमीत यावेळी १६ उमेदवार आहे. २०१४ च्या तुलनेत उमेदवारांची संख्या ७ ने कमी झाली असली तरी १० नवीन उमेदवार यावेळी गड सर करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : रामटेकच्या रणभूमीत यावेळी १६ उमेदवार आहे. २०१४ च्या तुलनेत उमेदवारांची संख्या ७ ने कमी झाली असली तरी १० नवीन उमेदवार यावेळी गड सर करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. यासोबतच गतवेळी लढत देणारे सहा उमेदवार याही वेळी मैदानात कायम आहेत. यात शिवसेनेचे कृपाल तुमाने, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे (मार्कसिस्ट-लेनिनिस्ट) बंडू मेश्राम, अपक्ष गौतम वासनिक, डॉ. नत्थूराव लोखंडे, संदेश भालेकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या किरण रोडगे-पाटणकर यांचा समावेश आहे. रोडगे गतवेळी बसपाच्या उमेदवार होत्या यावेळी त्या वंचित बहुजन आघाडीकडून रामटेकच्या रणभूमीत उतरल्या आहे. कॉँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यावेळी निवडणूक लढत नसल्याने काँग्रेसने माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना संधी दिली आहे.यासोबतच रोडके यांनी वंचित बहुजन आघाडीचा आधार घेतल्याने बसपाने येथे सुभाष गजभिये यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि बसपाला यावेळी रामटेकमध्ये नव्या उमेदवारांना संधी द्यावी लागली. उर्वरित आठ नवीन चेहऱ्यात राष्ट्रीय जनसंभावना पार्टीच्या अर्चना उके, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे चंद्रभान रामटेके, पीपल्स पार्टी आॅफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे डॉ.एल.जे.कान्हेकर, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे विनोद पाटील, सोशालिस्ट युनिटी सेंटर आॅफ इंडिया (कम्युनिस्ट) शैलेश जनबंधू तर अपक्ष म्हणून अनिल ढोणे, कांतेश्वर तुमाने, सोनाली बागडे नशीब अजमावत आहेत. लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता मतदार संघात प्रचाराला वेग आला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक