शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; आमचा जाहीरनामा; करपद्धतीत स्थिरता आणावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 10:14 IST

लघु व मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचा समावेश सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात करावा असे मत नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष सुरेन दुरगकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशातील प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष करप्रणालीत स्थिरता आणल्यास उद्योग व व्यावसायिक क्षेत्राला प्रोत्साहन मिळून देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ होईल. याशिवाय लघु व मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचा समावेश सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात करावा असे मत नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष सुरेन दुरगकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे.जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर अप्रत्यक्ष कराचे उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे आयकराचा स्लॅब वाढविल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. सरकारने आयकरात असेसमेंट व आॅनलाईन प्रक्रियेत केलेल्या सुधारणा प्रशंसनीय आहे. या सुधारणा पुढेही सुरू राहण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी विशेष योजनांचा जाहीरनाम्यात समावेश करावा. उद्योजक व व्यावसायिक कर भरण्यास तयार आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत राजकीय पक्षांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. जीएटी लागू झाल्यानंतर पूर्वी असलेली रिटर्नची संख्या कमी झाली आहे. पण राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात करटप्पा आणि रिटर्नची संख्या कमी करण्याची घोषणा करावी. रिटर्नची संख्या तिमाही एक आणि वार्षिक एक अशी पाच असावी.लघु व मोठ्या उद्योगांमध्ये कौशल्य मनुष्यबळ सहजरीत्या उपलब्ध होण्यासाठी पक्षांनी कौशल्य विकास कार्यक्रमावर भर द्यावा. इन्फ्रास्ट्रक्चर हा रोजगार निर्मितीचा मोठा व्यवसाय आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी पक्षांनी नवीन योजनांचा जाहीरनाम्यात समावेश करावा. देशविदेशातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कारण त्यावर अवलंबून असणाऱ्या लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल, असा उल्लेख जाहीरनाम्यात करावा.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक