शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; नागपूर मनपा मुख्यालयात आचारसंहितेचे खुलेआम उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 10:57 IST

निवडणूक आचारसंहिता लागू होताच राजकीय पक्ष व शासकीय योजनांशी संबंधित बॅनर, पोस्टर व होर्डिंग हटविले जाते. परंतु महापालिका मुख्यालयात बसपाचे उमेदवार मो.जमाल यांच्या कक्षापुढे त्यांच्या नावाची पाटी पक्षाच्या चिन्हासह अजूनही कायम आहे.

ठळक मुद्देबसपा उमेदवाराच्या कक्षापुढे पक्षाचे चिन्ह असलेली नेमप्लेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक आचारसंहिता लागू होताच राजकीय पक्ष व शासकीय योजनांशी संबंधित बॅनर, पोस्टर व होर्डिंग हटविले जाते. विकास कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या नावाच्या कोनशिला, फलक झाकले जातात. शासकीय कार्यालयातही नावाच्या पाट्या असल्यास त्या काढल्या जातात. परंतु महापालिका मुख्यालयात बसपाचे उमेदवार मो.जमाल यांच्या कक्षापुढे त्यांच्या नावाची पाटी पक्षाच्या चिन्हासह अजूनही कायम आहे.महापालिकेत बसपाचे दहा नगरसेवक आहेत. मो. जमाल हे गटनेते असल्याने त्यांना महापालिका मुख्यालयात कक्ष देण्यात आला आहे. कक्षाबाहेर त्यांच्या नावाची पाटी व त्यावर पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. २५ मार्चला बसपाकडून मो.जमाल यांनी नागपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्या नावाची पाटी हटविणे आवश्यक होते.यासंदर्भात महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही राजकीय पक्षाचा उमेदवार असलेल्या नगरसेवकांनी वा पदाधिकाऱ्यांनी आपल्या कक्षापुढील नावाची पाटी काढणे वा झाकणे आवश्यक असल्याचे सांगितले. जमाल यांनी नावाची पाटी झाकली नसल्यास ती झाकली जाईल किंवा हटविण्यात येईल. आचारसंहितेच्या कालावधीत शासकीय मालमत्तेच्या माध्यमातून कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार व्हायला नको, असेही धामेचा म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक