शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; शेवटच्या दिवशी होणार गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 11:13 IST

भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे नाना पटोले, शिवसेनेचे कृपाल तुमाने हे प्रमुख उमेदवार सोमवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असून प्रशासनाची चांगलीच कसरत होणार आहे.

ठळक मुद्देगडकरी, पटोले, तुमानेसह सर्वच इच्छुक भरणार अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघातून शुक्रवारी नऊ उमेदवारांनी तर रामटेकमधून केवळ दोन उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. शनिवार आणि रविवार शासकीय सुटी आहे. त्यामुळे सोमवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे नाना पटोले, शिवसेनेचे कृपाल तुमाने हे प्रमुख उमेदवार सोमवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असून प्रशासनाची चांगलीच कसरत होणार आहे.राज्यात चार टप्प्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघासाठी सोमवार १८ मार्चपासून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. २१ मार्च रोजी धुलिवंदनाची सुटी आली. २३ मार्च हा चौथा शनिवार आणि २४ मार्च रोजी रविवार असल्याने सुटी आली. तेव्हा उमेदवारांना १८, १९, २०, २२ व २५ मार्च असे पाच दिवस उमेदवारी अर्ज सादर करायला मिळाले. परंतु पहिल्या तीन दिवसात नागपूर लोकसभेसाठी केवळ तीन अर्ज सादर झाले. रामटेकसाठी एकही अर्ज सादर झाला नाही. शुक्रवारी नागपुरातून नऊ आणि रामटेकमधून दोघांनी अर्ज सादर केला. शनिवार आणि रविवार सुटी आहे. तेव्हा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी सोमवार हा शेवटचा दिवस उरला आहे. त्या दिवशी प्रमुख उमेदवारांसह सर्व इच्छुक अर्ज सादर करतील. काँग्रेस-भाजप-शिवसेना या प्रमुख पक्षाचे उमेदवार अर्ज सादर करणार असल्याने कार्यकर्त्यांनी संख्याही मोठ्या प्रमाणावर राहील.

जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गेट सुरूनागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला एकूण तीन गेट आहे. दोन गेटचे काम सुरू असल्याने ते बंद आहे. सेतू कार्यालयाजवळचे एकमेव गेट सुरू आहे. तेथूनच सर्वांची ये-जा आहे. सोमवारी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल, तेव्हा एकच गेट सुरू असल्याने मोठी पंचाईत होणार आहे.

 १७९ लोकांनी घेतले २३३ अर्जनागपूर व रामटेक लोकसभा मिळून आतापर्यंत १७९ इच्छुकांनी २३३ अर्ज घेतले. परंतु केवळ १४ इच्छुकांनीच अर्ज सादर केले. यामध्ये नागपूर लोकसभा मतदार संघासाठी आतापर्यंत एकूण १२१ इच्छुकांनी १४८ अर्ज घेतले. रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ५८ इच्छुकांनी ८५ अर्ज घेतले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक