शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; काँग्रेसचे ‘झिंगाट’, भाजपचा ‘बाजीराव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 11:17 IST

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धूम सुरू आहे. देशपातळीवर भाजपाच्या प्रचाराचे ‘थीम साँग’ ‘हा मै भी चौकीदार हू...’ हे जोरात गाजत आहे.

ठळक मुद्देनिवडणूक प्रचाराचा फिल्मी फंडा उपराजधानीत वाजतोय दणक्यात

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धूम सुरू आहे. देशपातळीवर भाजपाच्या प्रचाराचे ‘थीम साँग’ ‘हा मै भी चौकीदार हू...’ हे जोरात गाजत आहे. तर काँग्रेसनेसुद्धा ‘सब की यही पुकार, काँग्रेस है इस बार’ राजकीय पक्षांची ही गीते मतदारांच्या कानामनात गुंजत असताना नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघात प्रचाराचा फिल्मी फंडा राजकीय पक्षाने आणला आहे. यात काँग्रेसच्या उमेदवारांनी झिंगाटच्या गाण्यावर तर भाजपाच्या उमेदवारांनी बाजीरावच्या गाण्यावर उपराजधानी दणाणून सोडली आहे.निवडणुकीच्या काळात ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार जनमानसात पोहोचविण्यासाठी म्युझिक कम्पोझर आणि रेकॉर्डिस्ट चारुदत्त जिचकार प्रचंड व्यस्त आहेत. त्यांच्याकडे रामटेक आणि नागपूर या मतदार संघातील मुख्य राजकीय पक्षांची प्रचाराची गीते तयार करण्याचे काम सुरू आहे. यावर्षी चर्चेत असलेल्या गीतांवर त्यांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रचार गीत तयार केले आहे. त्यामध्ये झिंगाट, बाजीराव या सिनेमातील लोकप्रिय गीतांवर उमेदवारांचे गुणवैशिष्ट्य आणि त्यांचा निवडणुकीतील अजेंडा लक्षात घेऊन गीते कम्पोज केली आहेत. नागपूरच्या भाजप उमेदवारासाठी त्यांनी बंदे मे है दम..., माऊली माऊली... या गीतांचीही रचना केली आहे. त्याचबरोबर स्वत:च लिहिलेली आणि स्वत:च क म्पोज केलेली गीते, रॅप साँगसुद्धा प्रचारासाठी तयार केले आहे. शिवसेनेच्या उमेदवाराने खास गावराणी स्टाईलचा पोवाडा आणि मराठी गीतांचा प्रचारासाठी उपयोग केला आहे. त्याचबरोबर भाजपासाठी त्यांनी पथनाट्य रचले आहे. याशिवाय उमेदवाराच्या कामाची डॉक्युमेंट्री तयार केली आहे. ऑटोमधून करण्यात येणाऱ्या प्रचाराच्या वेगळ्या पद्धतीच्या प्रचारसीडी तयार केल्या आहेत. सध्या त्यांच्या या रेकॉर्डिंग स्टुडिओत राजकीय सांगितिक वातावरण आले आहे.

दिवस-रात्र सुरू आहे कामप्रत्येक पक्षाने नियुक्त केलेल्या मीडिया प्रमुखांकडे प्रचाराची धुरा सोपविली आहे. प्रचार कसा प्रभावी ठरेल यासाठी त्यांच्या डिमांड स्टुडिओत येत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर ऑडिओ, व्हिडिओ क्लिप, ऑटोतील प्रचार, मेळाव्यातील प्रचार, शहरात स्क्रीन लावलेल्या फिरणाऱ्या गाड्यांसाठी डॉक्युमेंट्री अशा वेगवेगळ्या माध्यमासाठी प्रचार गीत रचले जात आहे. त्यासाठी लेखक, गायक, म्युझिक कम्पोझर, रेकॉर्डिस्ट दिवस-रात्र काम करीत आहे. प्रचाराचा वेळ कमी असल्याने या माध्यमांची डिमांड वाढली आहे.

प्रचारात देशभक्तिपर गीतांची डिमांड कमीपूर्वी प्रचारात देशभक्तिपर गीतांचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायचा. आता मात्र देशभक्तिपर गीते मागे पडली आहे. तुलनेत जास्त चर्चेत असलेली गीते, लोकांच्या कानामनात असलेली गीते प्रचारात जास्त प्रभावी ठरत आहे. जाहीर मेळाव्यात ही गीते लोक अगदी लक्ष देऊन ऐकतात. मनोरंजन सुद्धा या गीतांद्वारे होते. त्याचबरोबर अ‍ॅन्टी प्रचार गीते मत परिवर्तनासाठी जास्त प्रभावी ठरतात. उमेदवार आणि त्याचे निवडणूक चिन्ह जास्तीतजास्त मतदारांवर हॅमर व्हावे यासाठी चर्चेत असलेली गीते प्रचारात जास्त वापरली जातात.- चारुदत्त जिचकार, म्युझिक अरेंजर, कम्पोझर आणि रेकॉर्डिस्ट

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक