शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; नागपुरात आंबेडकर-ओवेसी गरजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 10:45 IST

वंचित बहुजन आघाडीच्या नागपुरात होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी हे दोघेही येणार असल्याने राजकीय वर्तुळात या सभेविषयी विशेष चर्चा आहे.

ठळक मुद्देसोमवारी नागपुरात सभा राजकीय गणितांवर प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारिप बहुजन महासंघ व एमआयएमप्रणीत वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभांना होत असलेली प्रचंड गर्दी पाहता यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी नवीन राजकीय शक्ती म्हणून उदयास आल्याचे दिसून येते. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीच्या नागपुरात होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी हे दोघेही येणार असल्याने राजकीय वर्तुळात या सभेविषयी विशेष चर्चा आहे.वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे सर्वेसर्वा व असदुद्दीन ओवेसी यांची १ एप्रिलला नागपुरात जाहीर सभा होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सागर डबरासे, रामटेकच्या उमेदवार किरण पाटणकर-रोडगे यांच्या प्रचारासाठी उत्तर नागपुरातील इंदोरा मैदान येथे सायंकाळी ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. तशी परवानगी मागण्यात आली आहे. दरम्यान, एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांची जाहीर सभेच्या यशस्वीतेसाठी बैठक झाली. यात वंचित आघाडीसोबत समन्वय साधून सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीचे ज्या पद्धतीने यापूर्वी सभा यशस्वी झाल्या आहेत, त्याच धर्तीवर ही सभा होईल, याची तयारी केली जात आहे. काही महिन्यांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा नागपुरातील कस्तूरचंद पार्कवर झाली. इतर सभेप्रमाणेच ही सभाही चांगलीच यशस्वी ठरली. त्या सभेत असदुद्दीन ओवेसी हे हजर नव्हते, तरीही सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. आता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह स्वत: असदुद्दीन ओवेसी संबोधित करणार असल्याने नागपूर व विदर्भातील एमआयएमचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. सध्या तरी या सभेबद्दल लोकांमध्ये आकर्षण दिसून येत आहे. परंतु प्रकाश आंबेडकर आणि ओवेसींची ही सभा नागपुरातील राजकीय गणितांवर किती प्रभाव पाडू शकेल, हे येणारी वेळच ठरवेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक