शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; रामटेकमध्ये ६२ टक्के उमेदवार ‘अंडरग्रॅज्युएट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 10:50 IST

लोकसभा निवडणुकांत रामटेक मतदारसंघातून उभे असलेले उमेदवार शिक्षणात माघारले असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील ६२ टक्के उमेदवारांनी शिक्षणासाठी महाविद्यालयाचे तोंडदेखील पाहिलेले नाही.

ठळक मुद्दे३७ टक्के उमेदवार दहावीपर्यंतच शिक्षित एकाही उमेदवारावर गुन्हा नाही

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांत रामटेक मतदारसंघातून उभे असलेले उमेदवार शिक्षणात माघारले असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील ६२ टक्के उमेदवारांनी शिक्षणासाठी महाविद्यालयाचे तोंडदेखील पाहिलेले नाही. ३७ टक्के उमेदवारांचे शिक्षण तर दहावीपर्यंतच झालेले आहेत. नागपूरच्या तुलनेत येथील पदवीधर उमेदवारांचे प्रमाण हे फारच कमी आहे.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. यातील १२ टक्के उमेदवार हे आचार्य पदवीधर आहेत. तर तेवढेच उमेदवार हे अनुक्रमे पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. राजकीय पक्षांनी मतदारसंघात एकूण १२ उमेदवार उभे केले आहेत. यापैकी ६६ टक्के उमेदवार हे ‘अंडरग्रॅज्युएट’ आहेत. या आकडेवारीतूनच राजकीय पक्षांची उदासीनता दिसून येत आहे.विविध गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या काही मतदारसंघात दिसून येत असताना, रामटेकमध्ये मात्र याबाबत सकारात्मक चित्र आहे. या मतदारसंघातील एकाही उमेदवारावर कुठलाही गुन्हा किंवा न्यायालयीन खटला दाखल नाही.६८ टक्के उमेदवार मतदार संघाबाहेरीलरामटेक मतदारसंघात थोडेथोडके नव्हे तर ६८ टक्के उमेदवार हे मतदारसंघाबाहेरील आहेत. त्यांचे निवासस्थान हे नागपूर येथील असून मतदानदेखील नागपुरातच आहे. केवळ १२ टक्के उमेदवार रामटेक मतदारसंघाच्या हद्दीतील आहेत. विशेष म्हणजे राजकीय पक्षांमधील ८२ टक्के उमेदवार हे रामटेक मतदारसंघातील रहिवासी नाहीत. तर अपक्षांमध्ये हेच प्रमाण ४० टक्के इतके आहे.उमेदवारांचे सरासरी वय पन्नासचरामटेक मतदारसंघातील उमेदवारांचे सरासरी वय हे पन्नास वर्ष इतके आहे. तेथील सर्वात तरुण उमेदवार हा २९ वर्षांचा आहे तर सर्वात वयस्क उमेदवार ७० वर्षांचे आहेत. रामटेकमधील ३८ टक्के उमेदवारांचे वय हे ५० हून कमी आहे. तर १९ टक्के उमेदवार हे चाळीशीच्या आतील आहेत. ३८ टक्के उमेदवार हे साठीहून अधिक वयाचे आहेत. राजकीय पक्षांचे ७२ टक्के उमेदवार हे पन्नासहून अधिक वयाचे आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक