शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

अजनी इंटर मॉडेल स्टेशन खापरीत लॉजिस्टीक हब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:15 IST

पुढील ५० वर्षाचा विचार करता अजनी रेल्वे स्थानकाला इंटर मॉडेल स्टेशन आणि खापरीला लॉजिस्टीक हब म्हणून विकसित करण्याबाबतच्या प्रकल्पाची योजना ....

ठळक मुद्देजागतिक स्तरावरील योजना तयार करा : नितीन गडकरी

सर्व प्रकारचे सहकार्य करणार : मुख्यमंत्री फडणवीसलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुढील ५० वर्षाचा विचार करता अजनी रेल्वे स्थानकाला इंटर मॉडेल स्टेशन आणि खापरीला लॉजिस्टीक हब म्हणून विकसित करण्याबाबतच्या प्रकल्पाची योजना जागतिक दर्जाची तयार करावी, अशी सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास प्रकल्पाला साकार करण्यासाठी राज्य सरकारतर्फे सर्वप्रकारचे सहकार्य करण्याचे घोषित केले.महामेट्रोच्यावतीने हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे मल्टीमॉडेल हब विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एनएचएआयतर्फे प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. सुरुवातीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.भारतमालाचे मुख्य व्यवस्थापक मनोज कुमार यांनी मल्टीमॉडेल हबबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रस्ता वाहतूक आणि माल वाहतुकीच्या दिशेने जे पाऊल उचलायला हवे होते ते झाले नसल्याने नागपूर शहरात वाहतुकीच्या समस्या वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इंटर मॉडेल स्टेशन आणि लॉजिस्टीक हबची योजना बनवण्यात आली आहे. अजनीमध्ये रेल्वेची ४५० एकर जमीन आहे.तर इंटर मॉडेल स्टेशन (आयएमएस)साठी ५० ते ६० एकर जमिनीची गरज आहे. मेट्रो स्टेशन, रिंग रोडची सुविधा उपलब्ध असल्याने रेल्वे, बस आणि मेट्रो एकाच ठिकाणी प्रवाशांना उपलब्ध होईल. विमानतळाशीही अजनी कनेक्ट आहे. ‘मल्टी लेव्हल पार्किंग’ आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सचा यात समावेश राहील. त्याचप्रकारे तुरुंगाचीही १५० एकर जागा आहे.या विषयावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, तरुंग सुद्धा शहराच्या सीमेबाहेर जाणार आहे. तेव्हा या जागेचाही उपयोग होऊ शकतो.खापरीमध्ये लॉजिस्टीक हबबाबत झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की खापरीमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा पार्किंगसाठी मिळू शकते. एचपीसीएल सुद्धा शहराबाहेर जात आहे. अजनी आणि खापरी स्टेशनला इंटर मॉडेल स्टेशन आणि लॉजिस्टीक हब बनवण्यासाठी १४०० कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहितीही यावेळी दिली.केंद्रीय अर्थसंकल्पात १६०० कोटी रुपयाची तरतूद करण्यात करण्यात आल्याची माहिती मिळताच गडकरी यांनी दोन्ही प्रकल्पासाठी जागतिक स्तरावरील योजना बनवणे आणि यासाठी नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरण आणि नागपूर महानगरपालिका यांचे संयुक्त सहकार्य घेण्याचे निर्देशही दिले. भारत माला प्रकल्पांतर्गत नागपूर ते इंदोर, सूरत, सोलापूर आणि रायपूर हे चार कॉरिडोर जोडण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या सादरीकरणासाठी सर्व आमदार व खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते.याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाड़े, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जिलाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल, नासुप्र सभापति डॉ. दीपक म्हैसेकर, एनएचएआय प्रोजेक्ट डायरेक्टर चंद्रशेखर, आर.के पांडे, महामेट्रो प्रोजेक्ट डायरेक्टर महेश कुमार, रोलिंग स्टॉक डायरेक्टर सुनील माथुर, फायनान्स डायरेक्टर शिवमाथन, महाप्रबंधक (प्रशासन) अनिल कोकाटे, सुधीर देऊळगावकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.मेट्रोने जोडणारयावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांना मेट्रोची गरज लक्षात घेऊन मेट्रो रेल्वेच्या दुसºया टप्प्याची योजना तयार करण्याचे निर्देश देत कन्हान, बुटीबोरी, कोराडी आणि कापसीला मेट्रो रेल्वेशी जोडण्यासाठी व्यावसायिक जागा उपलब्ध करून देण्याची माहिती दिली. त्यांनी नवीन कन्हान पुलाच्या बांधकामानुसार योजना तयार करण्याचे निर्देश एनएचएआय आणि महामेट्रोला दिले. यामुळे मेट्रो रेल्वेला नव्याने काम करावे लागणार नाही. त्यातून वेळेची आणि निधीचीही बचत होईल.तुकडोजी पुतळा ते अजनी चौकापर्यंत उड्डाण पूलगडकरी यांनी तुकडोजी पुतळा चौकातून वंजारीनगर पाण्याची टाकीमार्गे अजनी चौकापर्यंत नवीन उड्डाण पूल बनवण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी रेल्वेची जमीन उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करण्याची आणि जमीन मिळताच मार्च २०१८ पर्यंत उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्याची घोषणा केली.