शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

१५ ते २१ मार्च दरम्यान नागपुरात लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:11 IST

मनपा आयुक्तांचे आदेश: अत्यावश्यक सेवा सुरू राहणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शहरात कडक लॉकडाऊन ...

मनपा आयुक्तांचे आदेश: अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी जारी केले. आदेशानुसार नागपुरात १५ मार्च ते २१ मार्च दरम्यान कडक लॉकडाऊन लागू राहणार आहे. मात्र यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी व कारवाई करण्याचे अधिकार मनपाचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, झोनचे सहायक आयुक्त, त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे मनपा अधिकारी, सर्व संबंधित पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.

....

हे राहणार बंद

- शहरातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था

- शहर सीमेतील कोणत्याही धार्मिक व राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम

- शहरातील सभागृह, मंगल कार्यालये, लॉन या ठिकाणी होणारे लग्नसमारंभ.

- धार्मिक स्थळे नागरिकांना दर्शनासाठी बंद राहतील. मात्र नियमित पूजाअर्चा ५ लोकांच्या उपस्थितीत करता येईल.

- शहरातील सर्व आठवडी बाजार

- रेस्टॉरन्ट, हॉटेल, खाद्यगृह बंद राहतील. (होम डिलिव्हरी सुरू राहील)

- तरणतारण तलाव

- क्रीडा स्पर्धांचे आयोजन

- सर्व खासगी आस्थापना (आर्थिक लेखाविषयक सेवा वगळून)

- मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृह

- दुकाने, मार्केट

- शहरातील उद्याने नागरिकांसाठी बंद

- व्यायामशाळा, जीम

- दारू दुकाने बंद, घरपोच सेवा सुरू

......

हे राहणार सुरू

- वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स

- वृत्तपत्र, मीडिया संदर्भातील सेवा

- दूधविक्री व पुरवठा

- भाजीपाला विक्री व पुरवठा

- फळविक्री व पुरवठा

- पेट्रोल पंप, गॅस एजन्सी

- सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवा(५० टक्के क्षमतेने)

- शासकीय व निमशासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळून )२५ टक्के उपस्थितीत

- मालवाहतूक सेवा

- बांधकामे, उद्योग, कारखाने

- किराणा दुकाने

- चिकन, मटन, अंडी, मास दुकाने

- पशुखाद्य दुकाने

- बँक, पोस्ट सेवा

- कोरोनाविषयक लसीकरण सेवा व चाचणी केंद्र

- ऑप्टिकल्स दुकाने

- खते, बी-बियाणे दुकाने

- निवासाकरिता असलेली हॉटेल्स, लॉज(५० टक्के क्षमतेने)

......................