शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवतींनी सोडली वस्ती : त्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 21:17 IST

शहरातील बहुतेक भागातील रस्त्यांची दुर्दशा झालेली असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. कधी मुदत संपल्याने तर कुठे वेगवेगळ्या बांधकामामुळे रस्ते खराब झाले आहेत. घोगली रोडवरील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा जीवघेणा प्रवास झाला आहे.

ठळक मुद्देघोगली रोडवरील लोकांची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील बहुतेक भागातील रस्त्यांची दुर्दशा झालेली असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. कधी मुदत संपल्याने तर कुठे वेगवेगळ्या बांधकामामुळे रस्ते खराब झाले आहेत. घोगली रोडवरील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा जीवघेणा प्रवास झाला आहे. पिरॅमिड सिटी या पॉश वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांनी ही व्यथा लोकमतजवळ मांडली आहे. वसाहतीचा रस्ता अक्षरश: ओबडधोबड झाला आहे. या रस्त्याची एकूण लांबी ७५० मीटर आहे. ३५० मीटरचे सिमेंटीकरण झाले आहे पण उरलेला ३५० मीटर पार करणे दिव्य पार करण्यासारखे आहे. काही महिन्यांपूर्वी एका शाळेच्या बांधकामासाठी होणाऱ्या जड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था झाली. वाहन चालविणे सोडा, पायी चालणेही दुरापास्त झाले आहे. दररोज एकतरी दुर्घटना होते किंवा वाहने खराब होतात. काहीच दिवसांपूर्वी एक महिला अपघात झाल्यानंतर कोमामध्ये गेली होती. याबाबत अधिकारी व लोकप्रतिनिधींनाही तक्रार केली होती पण कुणीही गंभीरतेने घेतले नाही. येथील नागरिक बऱ्याच महिन्यांपासून हा त्रास सहन करीत आहेत. पावसाळ्यात तर बेहाल झाल्याचे लोकांनी सांगितले. अवस्था अशी आहे की वस्तीतील गर्भवती महिलांनी नियमित तपासायला जाताना धोका होण्याची शक्यता लक्षात घेत वस्ती सोडून इतर ठिकाणी खोली करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. त्यामुळे रस्त्याची समस्या कोण सोडविणार, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.श्रमदानाचा निर्णयप्रशासनाची यंत्रणा किंवा जनप्रतिनिधी गांभीर्याने घेत नसल्याने त्रस्त झालेल्या रहिवाशांनी आता स्वत:च पुढे येऊन रस्ता दुरुस्तीसाठी श्रमदान करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सर्व नागरिक मिळून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेणार असल्याचे निवेदनातून सांगण्यात आले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर