शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत, भाजप निवडणुकीसाठी आजही तयार"

By आनंद डेकाटे | Updated: June 2, 2025 20:43 IST

संघटनपर्व पूर्ण झाले आहे, राहिला प्रश्न निवडणुकीचा तयारीचा तर उद्याही निवडणूक लागली तरी भाजपा तयार आहे. महायुती तयार आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

आनंद डेकाटे

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा जो सार आहे तो बघितला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत होतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ते माध्यमांशी बोलत होते. ऑक्टोबर पर्यंत निवडणुका झाल्या पाहिजे, कारण खाली अस्वस्थता आहे. निवडणुका झाल्या तर नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका या माध्यमातून १३ हजार नवीन नेतृत्व तयार होतील, असेही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक शिवाय स्थानिक विकास होऊ शकत नाही, म्हणून केंद्र, राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही एकत्रितपणे काम केले तर व्यवस्थित होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाची आता दीड कोटी सदस्यता झाली आहे. संघटनपर्व पूर्ण झाले आहे, राहिला प्रश्न निवडणुकीचा तयारीचा तर उद्याही निवडणूक लागली तरी भाजपा तयार आहे. महायुती तयार आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

पक्ष प्रमुखाशी चर्चा करून वाद सोडवावेकुठलेही वाद चव्हाट्यावर वाढण्यापेक्षा बसून वाद सोडवता येतात, जाहीररित्या टीका करण्याची गरज नाही. खरे तर मी कुठल्या पक्षाला सल्ला देणे योग्य नाही. रस्त्यावर जे वाद होतात ते न होता आपापल्या पक्षप्रमुखांशी चर्चा करून ते सोडवावे, असा सल्लाही बावनकुळे यांनी यावेळी दिला. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री फडणवीस हे लवकरच सोडवतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा