शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच भूखंडावर तीन बँकांकडून कर्ज

By admin | Updated: May 21, 2017 02:28 IST

एकाच भूखंडावर तीन वेगवेगळ्या बँकांमधून कर्ज काढले जाते. बँक अधिकारी डोळेझाकपणे कर्ज देतात अन् आरोपी लाखोंची रक्कम लाटतात.

सारेच संशयास्पद : बनवाबनवी उघड, गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकाच भूखंडावर तीन वेगवेगळ्या बँकांमधून कर्ज काढले जाते. बँक अधिकारी डोळेझाकपणे कर्ज देतात अन् आरोपी लाखोंची रक्कम लाटतात. वर्षभरानंतर हा गैरप्रकार उघडकीस येतो अन् नंतर एमआयडीसी पोलीस गुन्हा दाखल करतात. सारेच कसे संशयास्पद वाटणारे हे प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे. लाखनी (जि. भंडारा) जवळच्या सलोटी येथील रहिवासी श्रीधर रामभाऊ ताकमोडे याने मौजा वाठोडा येथील २०२ क्रमांकाचा भूखंड विकत घेण्यासाठी कर्ज हवे म्हणून एमआयडीसीतील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत काही महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. बँक अधिकाऱ्यांनी या भूखंडांची कागदपत्रे तारण ठेवून ताकमोडेला १५ लाख, ७५ हजारांचे कर्ज दिले. त्यानंतर ताकमोडेने याच भूखंडाचे दुसरे एक विक्रीपत्र इंडियन ओवरसीज बँक, हुडकेश्वर येथे गहाण ठेवून १६ लाख, ८० हजारांचे कर्ज घेतले. त्यानंतर तुळशीराम गणपत बारापात्रे (रा. पंचतारा सोसायटी, सोमलवाडा) याने याच भूखंडाची आरोपी ताकमोडेला विक्री केल्याचे दाखवून ते विक्रीपत्र पंजाब सिंध बँकेत तारण ठेवले आणि तेथून १९ लाखांचे कर्ज घेतले. विशेष म्हणजे, या तीनही प्रकरणात मिळालेली संपूर्ण रक्कम आरोपी बारापात्रेच्या खात्यात जमा झाली. त्यावरून बारापात्रेने ताकमोडेसोबत संगनमत करून वेगवेगळ्या इसमांना या भूखंडांची विक्री केल्याचे दाखवून तीन बँकांना ५१ लाख, ५५ हजार रुपयांचा गंडा घातला. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर संतोष देवीदास देशपांडे (वय ५७, रा. कादंबिनी विहार, स्वामी समर्थ मंदिरजवळ हुडकेश्वर) यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्यावरून आरोपी बारापात्रे आणि ताकमोडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे. आणखी कुणाचा सहभाग ? विशेष असे की, आरोपींनी एकाच भूखंडाची तीन वेळा वेगवेगळ्या पद्धतीने खरेदी विक्री केल्याचे दाखवून चक्क ५१ लाख, ५५ हजारांचे कर्ज उचलले. आॅनलाईन बँकिंग सिस्टिम आणि हायटेक बँकिंगचा दावा करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांनी कर्ज कसे उपलब्ध करून दिले, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या बनवाबनवीत कुणी बँक अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा समावेश आहे का, या प्रश्नाचेही पोलीस उत्तर शोधत आहेत.