शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

भेदभावाच्या वातावरणाविरोधात साहित्यिकांनी बोलावे; ज्ञानपीठ विजेत्या प्रतिभा राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:07 IST

शेकडो वर्षापासून सुरू असलेला जातीय भेदभाव, धार्मिक कट्टरपणावर साहित्यिकांनी कठोर प्रहार करावा, असे आवाहन ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा राय यांनी केले.

ठळक मुद्देसुमतीताई-भालचंद्र व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगात वाढणारा धार्मिक कट्टरवाद, हिंसात्मक वातावरणाला राजकीय शक्तींकडूनच मिळणारे प्रोत्साहन आणि याद्वारे नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत असल्याने प्रेमभावाची सामाजिक व्यवस्थाच ढासळत चालली आहे. अशावेळी लेखक, साहित्यिकांनी मूकदर्शक राहून चालणार नाही. शेकडो वर्षापासून सुरू असलेला जातीय भेदभाव, धार्मिक कट्टरपणावर साहित्यिकांनी कठोर प्रहार करावा, असे आवाहन ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा राय यांनी केले.विदर्भ सांस्कृतिक परिषदेच्यावतीने आयोजित सुमतीताई-भालचंद्र व्याख्यानमालेत ‘असीम है ये विश्व’ विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. सर्वोदय आश्रम, बोले पेट्रोल पंप, अमरावती रोड येथे या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी करण्यात आले. त्या पुढे म्हणाल्या, हे संपूर्ण विश्व अलौकिक अशा नैसर्गिक शक्तीने चालत आहे. या शक्तीला ईश्वर मानून वेगवेगळ्या धर्मियांनी वेगवेगळ्या नावाने संबोधले आहे. पण खरा ईश्वर कसा आणि कुठे आहे हे कुणालाच माहीत नाही. मनुष्याने स्वत:च्या भल्यासाठी ईश्वर नामक शक्तीची निर्मिती केली, मात्र आता याच ईश्वराच्या नावाने एकमेकांविरोधात हिंसाचार केला जातो.मनुष्य आणि इतर सर्व सजीवांना ईश्वराची नितांत आवश्यकता आहे. मात्र हा ईश्वर चांगल्यासाठी असावा. स्वर्ग-नरक या व्यर्थ कल्पना आहेत. खरा स्वर्ग या आपल्या पृथ्वीवरच आहे. या पृथ्वीलाच स्वर्ग बनविणाऱ्या ईश्वराची व तशा विचाराने चालणाऱ्या माणसांची नितांत आवश्यकता असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.दहशतवाद हा वाईटच आहे व देशाच्या संरक्षणासाठी त्याचा बीमोड करणे आवश्यकच आहे. मात्र एखादी व्यक्ती किंवा अल्पवयाचा तरुण या वाईट मार्गाकडे का जातो, याचे चिंतन झाले पाहिजे. कारण जगातील प्रत्येकाला शांतपणे आयुष्य जगण्याची लालसा असते.त्यामुळे हिंसाचार करणारे दहशतवादी कुठल्यातरी मातेचा पुत्र आहे व तो या मार्गाला का लागला याची कारणे शोधून त्या कारणाला नष्ट करणे आवश्यक आहे. शेवटी ‘वसुधैवकुटुंबकम’ या संकल्पनेप्रमाणे हे संपूर्ण जग आपले कुटुंब आहे, ही भावना महत्त्वाची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.लहानपणी मी वडिलांना, किती बांबू जोडून आकाशाच्या पार जाता येईल व ईश्वराला भेटता येईल असे विचारायचे. त्यांनी मात्र परीकथा सांगण्याऐवजी या केवळ कल्पनामात्र असल्याचे उत्तर दिले. माझे समाधान झाले नाही आणि तेव्हापासून मी ईश्वराचा शोध घेत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.आकाशाला मर्यादा आहेत असे म्हणतात, पण नैसर्गिक व वैज्ञानिकदृष्ट्या आकाश असिमीत आहे, त्यास अंत नाही. मग आपल्या विचारांना मर्यादा का असावी, असा प्रश्न करीत आपल्या कल्पनांना, विचारांना मर्यादित करू नका, त्यांना मुक्तपणे विहार करू द्या, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पाटील यांनी तर संचालन अजेय गंपावार यांनी केले. डॉ. विलास देशपांडे यांनीआभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्य