शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

'होम क्वारंटाईन'ची ती यादी केवळ प्रवास करून आलेल्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 00:45 IST

शुक्रवारी दुपारनंतर शहरातील विविध व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर एक मॅसेज व्हायरल होत होता. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला होता की, सोबत दिलेल्या यादीत ज्या लोकांची नावे आहेत त्यांना कोरोना विषाणू संसर्गामुळे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावासह त्यांचे पत्ते व फोन नंबरही देण्यात आले होते. तेव्हापासून या लोकांचे जगणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देयादी जारी करणाऱ्यांची पोलीस चौकशी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी दुपारनंतर शहरातील विविध व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर एक मॅसेज व्हायरल होत होता. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला होता की, सोबत दिलेल्या यादीत ज्या लोकांची नावे आहेत त्यांना कोरोना विषाणू संसर्गामुळे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावासह त्यांचे पत्ते व फोन नंबरही देण्यात आले होते. तेव्हापासून या लोकांचे जगणे कठीण झाले आहे.या यादीमधील काही लोकांशी लोकमतने फोनवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही यादी जेव्हापासून व्हायरल झाली आहे, तेव्हापासून त्यांना परिचितांचे फोन येत आहेत. या मेसेजने त्यांचे जगणे कठीण केले आहे. एका व्यक्तीने असेही सांगितले की, काही दिवसांपूर्वी ज्या लोकांसोबत त्याची ओळख झाली होती, ते लोक आता ही यादी व्हायरल झाल्याने आमच्यावर शंका घेताना दिसत आहेत. शेजारीही आमच्यापासून दूर झाले आहेत.हे आहे खरे कारण?या यादीमधील व्यक्तींसोबत जेव्हा लोकमतने फोनवर चर्चा केली, तेव्हा त्यांनी सांगितले की, ते काही दिवसांपूर्वीच नागपूरमधून बाहेर फिरायला गेले होते त्यांची ट्रॅव्हलिंग हिस्ट्री असल्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी केली. यातील एका व्यक्तीने असेही सांगितले की, कोरोना विषाणू संसर्गाबाबत तपासणीबाबत डॉक्टरांना विचारले असता त्यांनी याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. म्हणजेच हे लोक केवळ त्यांनी अलीकडेच प्रवास केला असल्याने त्यांना या यादीत सामील करण्यात आले आहे.घाबरू नका, ते कोरोनाबाधित नाहीतजी यादी सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे आणि त्यात असा दावा केला जात आहे की, ही यादी होम क्वारंटाईन व्यक्तींची आहे, त्या नावांच्या व्यक्तींपासून घाबरण्याची गरज नाही. कारण ते लोक केवळ विविध भागांतून प्रवास करून आल्यामुळे या यादीत सामील करण्यात आले आहेत. ते कोरोना विषाणूबाधित नाहीत. अशा वेळी नागपूरकर नागरिकांना घाबरण्याची आवश्यकता नाही.चौकशी केली जात आहेया प्रकारची कुठलीही यादी नागपूर पोलिसांनी जारी केलेली नाही. आम्हाला या प्रकरणाची तक्रारही मिळाली आहे. याची चौकशी केली जात आहे. डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Policeनागपूर पोलीस