शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डाच्या इमारतीत दारूच्या बाटल्या

By admin | Updated: August 12, 2016 02:40 IST

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करणाऱ्या नागपूर बोर्डाच्या इमारतीत दारूच्या बाटल्या आढळल्या आहे.

गोपनीय दस्तावेजाची सुरक्षा वाऱ्यावर : हॉल रिकामा तरीही लाईट, पंखे सुरू नागपूर : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करणाऱ्या नागपूर बोर्डाच्या इमारतीत दारूच्या बाटल्या आढळल्या आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या संदर्भातील गोपनीय दस्तावेजही ओसाड पडले आहे. असामाजिक तत्त्वाला सहजतेने वावरता येईल अशी अवस्था बोर्डाची आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या मंडळात होत असलेले असे प्रकार बघून बोर्डाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय मंडळाची इमारत बाहेरून चकाचक दिसत असली तरी, इमारतीच्या आतमध्ये सुरू असलेला प्रकार धक्कादायकच आहे. लोकमतच्या टीमने गुरुवारी बोर्डाच्या इमारतीत केलेल्या आॅन दी स्पॉट पाहणीत भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या इमारतीत विद्यार्थ्यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात दस्तावेज ठेवले आहे. परंतु कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे असामाजिक तत्त्व सहज पोहोचून गोपनीय दस्तावेज गहाळ करू शकतात. जुनी इमारत असलेल्या काही कक्षामध्ये साहित्य उघड्यावर पडले आहे. इमारतीत स्वच्छतेचाही अभाव दिसून येतो. कचरा, लोखंडी पेट्या जिथे-तिथे पडलेल्या आहे. बोर्डाच्या इमारतीच्या मागच्या भागात मोठ्या प्रमाणात लोखंडी पेट्या पडलेल्या आहे. येथील स्वच्छतागृह अतिशय घाणेरडे आहे. कुत्र्यांचा वावर इमारत परिसरात बघायला मिळतो. नव्या इमारतीत एक भव्य हॉल तयार करण्यात आला आहे. या हॉलमध्ये टेबल खुर्च्या, काही दस्तावेजासह लोखंडी पेट्या पडलेल्या आहे. या हॉलचा प्रशिक्षणासाठी उपयोग होतो. एरवी बंदच असतो. गुरुवारी या हॉलमध्ये कुठलेही प्रशिक्षण नसतानाही हॉलचे सर्व लाईट, पंखे सुरू होते. अशीच अवस्था अनेक कक्षात बघायला मिळाली. कर्मचारी नसतानाही विजेचे दिवे, पंखे सुरूच होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इमारतीच्या टॉप फ्लोअरवर दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या. इमारतीच्या मागच्या भागात दारूच्या बाटल्या व ग्लास पडलेले होते. इमारतीच्या समोरच्या गेटवर काही सुरक्षा रक्षक तैनात असतात. परंतु आतमध्ये कुठेही मोकाटपणे फिरता येते. बोर्डाच्या इमारतीच्या परिसरात पडलेल्या दारूच्या बाटल्या, ग्लास लक्षात घेता, सायंकाळी येथे दारुड्यांचा अड्डाच भरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)