शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीप्रमाणे आता ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस वे’ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 20:28 IST

Nagpur News विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’ विकसित होऊन विदर्भ व मराठवाड्याचा चेहरामोहरा बदलेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.

नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’ विकसित होऊन विदर्भ व मराठवाड्याचा चेहरामोहरा बदलेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिलच्या (नरेडको) विदर्भ चॅप्टरच्यावतीने आयोजित ‘प्राइड ऑफ लँड अवॉर्ड’ वितरण सोहळयात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. बांधकाम व्यावसायिक आणि विकासक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना विविध गटातील उपलब्धीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

फडणवीस म्हणाले, नागपूर शहर लॉजिस्टिक हब म्हणून पुढे येणार आहे. नागपूर, वर्धा येथे पुढील काळात मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक सपोर्ट तयार होणार आहे. भारतातील प्रत्येक मोठे शहर आठ ते दहा तासात नागपूरशी जोडले जाणार आहे. त्यामुळे नागपुरात बांधकाम व्यावसायिक व विकासक यांना फार मोठी संधी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये ५ हजार किमीचे ‘एक्स्प्रेस’ महामार्ग तयार करण्याचे सूतोवाच केले आहे. हैदराबाद, दिल्लीकरिता नवीन मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात लॉजिस्टिक क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील सर्वात मोठा इकॉनॉमिकल कॉरिडॉर म्हणून विकसित होणार आहे. त्याच धर्तीवर आता नागपूर ते गोवा महामार्गाचा विचार केला जात आहे.

-फायलींवर बसणारे सरकार नाही

राज्यातील नवीन सरकार फायलींवर बसणारे नव्हे तर वेगाने निर्णय घेणारे आहे. सरकारकडे केवळ दोन वर्षे आहेत. अशा स्थितीत २०-२० सामना खेळायचा आहे.

-‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावणाऱ्यांना सोडणार नाही

देशात छापेमारीनंतर पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यकर्त्यांनी पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावल्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य असो वा देश, कुठेही पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावणाऱ्यांना सोडणार नाही. कुठेही लपून बसले तरीही त्यांना शोधून योग्य शिक्षा करूच.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस