शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

रामजन्माला घरोघरी उजळल्या पणती; दिव्यांची आरास करून श्रीरामनवमी केली साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 20:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऐरवी संध्याकाळी नागपुरात श्रीरामजन्मोत्सव शोभायात्रेत सहभागी होण्याची लगबग असते. यंदा मात्र कोरोना संसर्गाच्या धास्तीने ...

ठळक मुद्दे‘कोरोना वॉरिअर्स’च्या दीर्घायुष्याची केली प्रार्थना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐरवी संध्याकाळी नागपुरात श्रीरामजन्मोत्सव शोभायात्रेत सहभागी होण्याची लगबग असते. यंदा मात्र कोरोना संसर्गाच्या धास्तीने आणि संक्रमण टाळण्याच्या सजगतेने भक्तांनी शोभायात्रेचा मोह टाळला. शोभायात्रा आयोजकांनीही हिच सजगता बाळगत शहराच्या सर्वात मोठ्या उत्सवाला स्थगिती दिली. मात्र, आपल्या प्रिय देवतेच्या जन्माचा आनंद सोहळा साजरा न करतील ते भक्त कसले. दुपारच्या रामन्मोत्सवाला शांत असणाऱ्या नागपूरकरांनी संध्याकाळ हजारो दिव्यांनी उजळून टाकली. रामन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी घरोघरी पणत्यांची आरास सजवली गेली. जणू श्रीरामनवमीला दिवाळीच साजरी झाल्याची अनुभूती होत होती.विशेष म्हणजे, सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या संसर्गाला एकमुखाने, एकसंघतेने लढा देत आहे. इतर कुठल्याही संकटापेक्षा कोरोना नावाचे संकट अत्यंत वेगळे आहे. त्या संकटाचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन, संचारबंदी, नाकेबंदी करण्यात आली आहे. उत्सवप्रिय भारतात सगळ्या उत्सवांच्या आयोजनांना स्थगिती देण्यात आली आहे. अशा काळात कोरोना नावाच्या महाभयंकर संकटाला घालवून लावण्यासाठी सर्वच यंत्रणा आपापल्या तयारीने सज्ज आहेत. या संसर्गाची भिती घालविण्यासाठी आणि सरकारी दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी काही सामाजिक व धार्मिक संघटना नागरिकांमध्ये ऊर्जा भरण्याचे कार्य अभियानस्वरूपात करत आहेत. त्याच अभियानाचा एक टप्पा म्हणजे श्रीरामनवमीला संध्याकाळी प्रत्येक घरी नऊ दिवे आपल्या द्वारावर लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि सूर्यास्त होताच शुभंकरोतीच्या समयी गृहिणींनी द्वारावर नऊ दिव्यांची आरास सजवली. हळदी-कुंकूने औंक्षण केले आणि या महाभयंकर संकटापासून सोडविण्याची प्रार्थना संध्यादेवतेकडे करण्यात आली. शहराच्या कानाकोपºयात अशा पद्धतीने घरोघरी पणती उजळल्या. पणती उजळण्याच्या या अभियानाने नागपुरात गुरुवारी दिवाळीच साजरी झाल्याचा अनुभव प्राप्त होत होता..................

टॅग्स :Ram Navamiराम नवमी