शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

लाईट व रिफ्लेक्टर्सचे नियम वाऱ्यावर

By admin | Updated: January 22, 2015 02:54 IST

कायद्यातील लाईट व रिफ्लेक्टर्ससंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याची तक्रार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका जनहित याचिकेत करण्यात आली आहे.

नागपूर : कायद्यातील लाईट व रिफ्लेक्टर्ससंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याची तक्रार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका जनहित याचिकेत करण्यात आली आहे. बुधवारी हे प्रकरण सुनावणीसाठी आले असता वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन अधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतरही दोषी वाहन मालकांवर नियमित कारवाई करीत नसल्याचे याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने तीन आठवड्यांत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विनय कुंटे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. त्यांनी २०१० मध्ये ही जनहित याचिका दाखल केली आहे. वाहनांवर रिफ्लेक्टर्स लावण्याचे नवीन निकष तयार करण्यात यावेत, रिफ्लेक्टर्स मोठे, ठळकपणे दिसणारे व स्वयंप्रकाशी असावेत, मोटर वाहन कायदा-१९८८, केंद्रीय मोटर वाहन नियम-१९८९ व महाराष्ट्र मोटर वाहन नियम-१९८९ मधील लाईट व रिफ्लेक्टर्ससंदर्भातील निकष पाळत नसलेल्या वाहन मालकांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि अनफीट वाहनांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशी त्यांची विनंती आहे. २०१० मध्ये वाहतूक पोलीस उपायुक्त व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाईची माहिती सादर केली होती. २८ जानेवारी २०११ रोजीच्या आदेशात न्यायालयाने दोषी वाहन मालकांवर नियमित कारवाई करीत राहण्याची व यासाठी विशेष मोहीम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच, ३ महिन्यांनंतर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, न्यायालयाच्या या आदेशावर योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. मोटर वाहन कायदा-१९८८ मधील ५६ (४) कलमानुसार योग्य प्रकरणांमध्ये फिटनेस प्रमाणपत्र रद्द केले जाऊ शकते. वेगमर्यादा निश्चित केल्यास प्राणघातक अपघातांची संख्या कमी करता येऊ शकते. अपघातानंतरची ६० मिनिटे महत्त्वाची असतात. या वेळेत योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास अपघातग्रस्ताला वाचविले जाऊ शकते, ही बाबही याचिकाकर्त्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यासंदर्भातही शासनाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.(प्रतिनिधी)