शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

-तर जीवच गेला असता !

By admin | Updated: January 20, 2016 04:05 IST

वेळ दुपारी २.३० वाजताची. बरेच वकील दुपारचे भोजन करून दुसऱ्या सत्रातील कामकाजासाठी कोर्टरूमकडे निघून गेले

नागपूर : वेळ दुपारी २.३० वाजताची. बरेच वकील दुपारचे भोजन करून दुसऱ्या सत्रातील कामकाजासाठी कोर्टरूमकडे निघून गेले होते. काही मोजकेच वकील, वकिलांचे अ‍ॅटर्नी व पक्षकार खोलीत उपस्थित होते. त्याचवेळी धाडकन आवाज झाल्यामुळे सर्वजण हादरून उभे झाले. खोलीतील क्युबिकल-४२ मध्ये लावलेला सिलिंग फॅन क्लिप तुटल्यामुळे खाली कोसळला होता. फॅनचे पाते डोक्याला लागल्यामुळे अ‍ॅटर्नी प्रज्ञेश मेश्राम किरकोळ जखमी झाले. परंतु फॅन डोक्यावर कोसळला असता तर नक्कीच कोणी तरी ठार झाले असते ही या घटनेची गंभीर बाजू आहे. या घटनेमुळे सर्वांचा थरकाप उडाला.उच्च न्यायालयात रोज दोन सत्रात कामकाज होते. पहिले सत्र सकाळी १०.३० ते दुपारी १.३० पर्यंत तर, दुसरे सत्र दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालते. पहिले सत्र संपल्यानंतर एक तासाचा लंच ब्रेक असतो. दरम्यान, वकिलांच्या सर्व खोल्या भरगच्च भरलेल्या असतात. अ‍ॅटर्नी व पक्षकारही मोठ्या संख्येत उपस्थित असतात. या कालावधीत सिलिंग फॅन कोसळणे नक्कीच कोणाच्या तरी जीवावर बेतले असते. वकिलांच्या खोल्यांतील अनेक सिलिंग फॅन जुने झाले आहेत. त्यांची नियमित देखभाल केली जात नाही. यामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर अनेक वकिलांनी हायकोर्टातील अव्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली.(प्रतिनिधी)संघटनेचे पदाधिकारी निष्क्रिय४हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे पदाधिकारी निष्क्रिय असल्याचा आरोप काही वकिलांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर केला आहे. वकिलांकडून संघटना सदस्यता शुल्क वसूल करते. परंतु सदस्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देत नाही. संघटनेकडे तक्रार करूनही काहीच होत नाही असे वकिलांनी सांगून आजच्या घटनेमुळे जीवितहानी झाली असती तर संघटनेने भरपाई दिली असती काय, असा सवाल उपस्थित केला.पीडब्ल्यूडीची जबाबदारीउच्च न्यायालयातील सुविधांची देखभाल करणे सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. पीडब्ल्यूडी अधिकारी छोटी छोटी कामे पूर्ण करण्यासाठी विलंब करतात. सिलिंग फॅन कोसळण्याची घटना प्रशासकीय न्यायमूर्ती, प्रशासकीय प्रबंधक व कोर्ट कीपर यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी सर्व सिलिंग फॅनची तपासणी करण्याचे विचाराधीन आहे.- अ‍ॅड. श्रद्धानंद भुतडा, सचिव, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर.