शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
5
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
6
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
7
पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
8
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
9
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
10
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
11
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
12
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
13
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
15
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
16
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
17
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
18
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
19
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
20
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...

कामगारांचा जीवघेणा संघर्ष

By admin | Updated: April 17, 2016 02:47 IST

आपले घर कधीही कोसळेल, या भीतीने डोक्यावर रुमाल ठेवून घरात वावरणाऱ्या इसमाची मनोरंजक कथा एका लेखिकेने मांडली होती.

मॉडेल मिल चाळ : ४१६ कुटुंबांची व्यथानिशांत वानखेडे नागपूरआपले घर कधीही कोसळेल, या भीतीने डोक्यावर रुमाल ठेवून घरात वावरणाऱ्या इसमाची मनोरंजक कथा एका लेखिकेने मांडली होती. कल्पनेतील ही भीती मॉडेल मिल चाळीत राहणाऱ्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष रोजच अनुभवावी लागत आहे. अतिशय जीर्ण झालेली ही चाळ कधी कोसळेल आणि येथे राहणारे जीव कधी ढिगाऱ्याखाली दबतील, हे सांगता येत नाही. रात्री झोपताना उजाडणारा दिवस पाहता येणार की नाही, ही भीती येथे राहणाऱ्या माणसांना प्रत्येक क्षणी अनुभवावी लागते आहे. डिसेंबर २००३ ला मॉडेल मिल बंद करण्याचा निर्णय झाला आणि मिल कामगार एका क्षणात बेरोजगार झाले. राहण्यासाठी चाळीचा आधार होता.जीर्ण झालेली चाळ किती दिवस टिकणार? नागपूर : ही चाळ पाडण्यासाठी महानगरपालिकेतर्फे १९९० ला पहिल्यांदा नोटीस बजावली होती. मात्र चाळ पाडली ती कामगारांचे कुटुंब रस्त्यावर येतील, या विचाराने कामगारांसाठी घरकूल बांधून मिळावे, अशी मागणी कामगारांनी केली. उच्च न्यायालयानेही २००४ साली कामगारांसाठी घरे बांधून देण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले. या चाळीत ४१६ कामगारांची नोंद आहे. मॉडेल मिल चाळ सुधार संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी शासनाने कामगारांच्या घरांसाठी टेंडर काढले आणि पी. पी. असोसिएटस्ला घरे बांधण्याचे कंत्राट देण्यात आले. २००६ च्या शासनाच्या जीआरनुसार मिल कामगारांच्या घरांसाठी ३.१६ एकर जागा राखीव ठेवण्यात आली. यादरम्यान शासनाने आरक्षित ३.१६ एकरव्यतिरिक्त असलेली जागा नॅशनल टेक्सटाईल्य कॉर्पोरेशन(एनटीसी)ला लीजवर दिली. २०११ ला ही लीज संपली. एनटीसीने ही जागा पी.पी. असोसिएटस्ला विकल्याचे सांगण्यात येत आहे. एनटीसी व पी.पी. असोसिएटस्मध्ये २००७ साली झालेल्या करारानुसार चाळीतील ४१६ कामगारांसाठी दोन वर्षात घरे बांधून द्यायची होती. मात्र आठ वर्षे लोटूनही पी.पी. असोसिएटस्कडून घरे बांधली गेली नाही. नगर रचना विभागाला सादर केलेल्या प्रस्तावानुसार विकासकाला १० कोटी रुपये भरायचे होते. मात्र पी.पी. असोसिएटस्ने हे शुल्क न भरल्यामुळे मिल कामगारांची घरकूल योजनाच थंडबस्त्यात गेल्याचे राजीव डोंगरे यांनी सांगितले. मिल बंद होऊन १४ वर्षे लोटली. चाळीच्या समोरच मॉडेल मिलच्या जागेवर भव्य अशी फ्लॅट स्कीम तयार झाली. मात्र गरीब कामगारांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. सुरुवातीला कामगारांच्या पुनर्वसनासाठी पुढे पुढे करणारे लोकप्रतिनिधी आज दिसेनासे झाले. कामगार कुटुंबीयांना मात्र आजही क्षणोक्षणी मरणाची भीती भोगावी लागत आहे.(प्रतिनिधी)न्यायालयात जाऊकामगारांच्या प्रश्नासाठी आम्ही दोनवेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. मात्र त्यांनीही याकडे कानाडोळा केला आहे. नझुलच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. मात्र त्यांनी कामगारांना विश्वासात न घेता ३० वर्षांची लीज वाढवून दिली. या जागेवर पी.पी. असोसिएटस्ची लीज रद्द करण्यात यावी. कामगारांच्या हक्कासाठी आता न्यायालयात लढा लढण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला आहे.- राजीव डोंगरे, अध्यक्ष, मॉडेल मिल चाळ सुधार संघर्ष समिती.