नागपूर : राष्ट्रीय आरोग्य विमा योजना ही रु ग्ण आणि डॉक्टरंच्या हिताची असतानाही ती बंद करून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मोठा गाजावाजा करीत सुरू केली. मात्र, ही योजना आखताना कोणतेही तारतम्य न दाखविल्याने रुग्णांची फरफटच सुरू आहे. विशेष म्हणजे, कॅन्सर रुग्णांना केमोथेरपी देतानाचा फोटो नाही म्हणून ४०वर क्लेम विमा कंपनीने अडवून ठेवल्याची धक्कादायक माहिती आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना चांगली आहे, परंतु ती राबविताना डॉक्टर आणि रुग्णालयांना येणाऱ्या समस्या व लाभार्थी रु ग्णांची होणारी अडवणूक यामुळे ही योजना मूळ हेतूपासून लांब जात आहे. या योजनेत सेवा देणाऱ्या खासगी इस्पितळांची मोठी यादी आहे. मात्र, योजनेला सुरू होऊन आठ महिने झाले असताना त्यांनी केलेल्या उपचाराची आकडेवारी बरेच काही सांगून जाते. शहरातील काही कॉर्पोरेट रु ग्णालयात तर फायद्याच्या शस्त्रक्रियाच होतात. काहींनी तर योजनेतील रुग्णांसाठी कालबाह्य झालेल्या यंत्रणा पुन्हा वापरात आणल्याची माहिती आहे. दुसरीकडे शासन या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष करीत सीमित आकड्यांकडे बोट दाखवीत योजना यशस्वी झाल्याचे सांगत आहे. यातून बाहेर येण्यासाठी प्रत्यक्ष तळागाळात ही योजना राबविणाऱ्या डॉक्टरांच्या व रुग्णांच्या समस्या नीट समजून घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. (प्रतिनिधी) डॉक्टरने फॉर्म भरायचा की उपचार करायचेया योजनेतील एका डॉक्टराने सांगितले, जीवनदायीतील सर्व काम आॅनलाईन चालते, ही कल्पना खूप चांगली आहे, पण यात रु ग्णांची आॅनलाईन नोंदणी करून ते त्या रु ग्णांच्या उपचाराची रक्कम मान्य होईपर्यंचा आॅनलाईन प्रवास इतका खडतर आणि तकलादू आहे की बरेच रु ग्ण या चाळणीतून पुढे जातच नाहीत. नशिबाने त्या रु ग्णाची नोंद झालीच तर त्यापुढे प्रत्येक रु ग्णाच्या सर्व क्लिनिकल माहितीचा एक लांबलचक फॉर्म भरून तो पाठवून स्वीकारला जाण्यासाठी किमान १८ तासांचा कालावधी उलटून जातो. गंभीर रु ग्णांच्या उपचाराची हमी देणाऱ्या या योजनेत वेळेचा एवढा अपव्यय कसा चालणार, असा प्रश्न निर्माण होतो. योजनेची रचना गंभीर रु ग्णांना योजनेचे गाजर दाखविण्यासारखी आहे. नोंदणी करण्यासाठीचा फॉर्म इतका मोठा व सविस्तर आहे की उपचार करणारा डॉक्टर सोडून दुसरा कुणी तो भरूच शकत नाही. व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ नेमूनही हे आॅनलाईन फॉर्म भरणे अशक्य आहे, त्यामुळे डॉक्टरने फॉर्म भरायचा की उपचार करायचे. त्यातच उपचार घेत असलेल्या रु ग्णाचा बेडवर झोपलेला फोटो, रोज त्याच्या प्रकृतीचा तपशील, रु ग्णालयातून जाताना त्याच्या हातात प्रवासाचे पैसे देतानाचे फोटो अशा निरर्थक बाबींच्या पूर्ततेच्या अटी टाकून ही योजना डॉक्टरांना राबविताच येऊ नये याची शासनाने पुरेपूर काळजी घेतली आहे, अशी शंका निर्माण होत आहे.
जीवनदायी योजना आॅक्सिजनवरच
By admin | Updated: July 30, 2014 01:22 IST