शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पाच आरोपींना जन्मठेप

By admin | Updated: January 8, 2017 02:08 IST

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर येथे तीन वर्षांपूर्वी मकरसंक्रांतीच्या दिवशी झालेल्या

सत्र न्यायालय : पप्पू काळे खूनप्रकरण नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर येथे तीन वर्षांपूर्वी मकरसंक्रांतीच्या दिवशी झालेल्या एका तरुणाच्या खूनप्रकरणी शनिवारी पहिले तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने पाच आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी ३५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. दंडाची एकूण रक्कम १७ हजार ५०० रुपये मृत तरुणाच्या आईला नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. संदेश ऊर्फ गोलू वेणू नाईक रा. हुडको कॉलनी, कामेश रवींद्र जांभुळकर रा. कौशल्यानगर अजनी, अकाश ऊर्फ बिट्टू जयकुमार सरोजकर , कुणाल भारत गोस्वामी आणि शेखर प्रकाश आंबुलकर तिन्ही रा. इंदिरानगर, अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर राजेश हरितस्वामी अ‍ॅन्थोनी रा. मार्टीननगर आणि शैलेश विजय मुखर्जी रा. कौशल्यानगर अजनी, अशी निर्दोष सुटका झालेल्या आरोपींची नावे आहेत. रूपेश ऊर्फ पप्पू जनार्दन काळे (२५), असे मृताचे नाव होते. तो हुडको कॉलनी येथील रहिवासी होता. खुनाची घटना १४ जानेवारी २०१४ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास इंदिरानगर भागात प्रवीण बोभाटे याच्या घराजवळ घडली होती. वस्तीत जास्त रंगदारी करतो आणि जुने भांडण यावरून आरोपींनी तलवार, चाकू, दगड आणि लाथाबुक्क्यांनी पप्पूवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. मेयो इस्पितळात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. अविनय धनराज गणवीर रा. नागार्जुन कॉलनी याच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी भादंविच्या ३०२, १४३, १४७, १४८ कलमान्वये गुन्हा दाखल करून २० जानेवारी २०१४ रोजी सर्व आरोपींना अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक एस. जे. नाईक यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन पाच आरोपींना भादंविच्या ३०२, १४९ कलमांतर्गत जन्मठेप, प्रत्येकी २ हजार रुपये दंड, भादंविच्या १४३, १४७ आणि १४८ या प्रत्येक गुन्ह्यासाठी ३ महिने कारावास, प्रत्येकी ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील वसंत नरसापूरकर, अ‍ॅड. सूरज गुप्ता यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल नामदेव पडोळे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)