शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालय, अध्ययन कक्ष व जलतरण तलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:09 IST

मनपा आयुक्तांचे आदेश : शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...

मनपा आयुक्तांचे आदेश : शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. वारंवार आवाहन केल्यानंतरही शहरातील नागरिक कोविड नियमांचे पालन करीत नाहीत. संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने अनेक निर्बंध लागू केले. ७ मार्चपर्यंत शहरातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालये, लॉन आदी बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार दर शनिवार व रविवारी बंद राहतील. बाजारपेठा, दुकाने, हॉटेल, रेस्टाॅरंट, खाद्यगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तर बुधवारी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पुन्हा सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार ग्रंथालय, अध्ययन कक्ष व जलतरण तलाव ७ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.

मागील काही दिवसांत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. कोविड नियमांचे उल्लंघन करणारी मंगल कार्यालये, लॉन, सभागृह, रेस्टाॅरंट, हॉटेल यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. बाजारातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दिशा-निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानंतरही नियम मोडले, तर साथरोग नियंत्रण अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलीस कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

.....

प्रशास अ‍ॅक्शन मोडवर

सध्या एनडीएस पथकामार्फत मास्क न लावणे, मंगल कार्यालये, लॉन, सभागृह आदींवर कारवाई केली जात आहे. आठवडी बाजार, तसेच सीताबर्डी, इतवारी, महाल, गांधीबाग, जरीपटका, खामला, धरमपेठ, गोगूळपेठ आदी बाजार भागांतील गर्दीवर नजर ठेवली जात आहे. तीन वेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजार रुपये दंड लावला जाणार आहे. संक्रमितांचा शोध घेऊन परिसर सील करण्याची कारवाई केली जात आहे. मनपा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे.